Latest

छन से जो टूटे कोई सपना! चहल-शिखर-सॅमसनला BCCIचा चकवा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन : Team India ODI World Cup squad : आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वतीने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत 15 खेळाडूंची नावे जाहीर केली. दरम्यान, यावेळच्या संघात ज्यांच्या नावाचा समावेश झाला आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्याचे चित्र आहे. पण ज्यांना संघता स्थान मिळाले नाही त्यांच्यासाठी हे स्वप्न भंगल्यासारखे आहे. या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचीही नावे आहेत.

शिखर-सॅमसन कमनशीबी

भारताचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा यापूर्वी 2015 आणि 2019 च्या विश्वचषक संघात समावेश होता, मात्र यावेळी त्याला स्थान देण्यात आलेले नाही. टीम इंडिया विसरली की काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. शिखर हा अनुभवी खेळाडू असून टॉप 3 त्याच्या सारख्या डावखु-या फलंदाजीची गरज होती. पण निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा शिखरला दुर्लक्षित केल्याची चर्चा आहे. यानंतर दुसरे नाव येते ते संजू सॅमसनचे. सॅमसनला अधूनमधून टीम इंडियात संधी मिळते, यादरम्यान त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. असे असूनही त्याचे संघातील स्थान डळमळीत असते. निवडकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या आशिया चषक संघातही सॅमसनचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला आहे.

चहलला संघातून का डावलले?

युझवेंद्र चहल हा टीम इंडियासाठी गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लेग-स्पिनर निर्णायक भूमिका बजावत आहे. मधल्या षटकांत बळी मिळवण्यात तो महत्त्वाचे योगदान देतो. मात्र, असे असूनही निवडसमितीने चहलला वगळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. चहलला गेल्या दोन वर्षांत सातत्याने संधी मिळालेली नाही, असे असतानाही त्याने 16 सामन्यांत 24 गडी बाद केले आहेत. त्यामुळे सर्वात मोठा स्वप्नभंग तर चहलचा झाला आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर, 2022 च्या टी-20 विश्वचषकात तो संघाचा भाग होता पण त्याला, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे विश्वचषका सारख्या मोठ्या स्पर्धेनंतर प्रत्येक वेळी युझवेंद्र चहलचे पुनरागमन होते आणि तो धडपडून चांगले प्रदर्शन करतो. पण तरीही त्याला पुढच्या विश्वचषकाच्या संघातून डावलले जाते. चहल 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळला होता, पण यंदा त्याला आपले स्थान संघात पक्के करता आले नाही. याशिवाय आणखी एक नाव आहे, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, तो देखील एकदिवसीय विश्वचषक 2019 खेळला होता, परंतु यावेळी त्यालाही स्थान देण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT