Latest

Rishabh Pant and Team India : ऋषभ, लवकर बरा हो… BCCI ने शेअर केला भावूक व्‍हिडिओ

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाच्‍या खेळाडूंनी यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याला  विशेष संदेश देणारा  व्‍हिडिओ आज ( दि. ३ ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) शेअर केला आहे. ऋषभ पंत याच्‍या कारला ३० डिसेंबर २०२२ रोजी पहाटे भीषण अपघात झाला होता. त्‍याच्‍यावर डेहराडूनमधील मॅक्‍स हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरु आहेत. त्‍याच्‍या प्रकृतीमध्‍ये सुधारणा होत असून, पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

तू नेहमीच टीम इंडियाला कठीण परिस्‍थितीतून बाहेर काढलेस : द्रविड

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्‍यासह खेळाडूंनी ऋषभ पंतला लवकर बरे होण्‍यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये राहुल द्रविड यांनी म्‍हटलं आहे की, "ऋषभ तुझ्‍या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. आशा आहे की, तू लवकर बरा होशील. गेल्या एका वर्षात मला भारतीय कसोटी इतिहासातील काही महान खेळी पाहायला मिळाल्या. तुला खेळताना पाहणे हे एक सौभाग्य आहे. तू नेहमीच टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची कामगिरी केली आहेस. मला विश्‍वास आहे की, तू तुझ्‍या नेहमीच्‍या शैलीने पुनरागमन करशील."

Rishabh Pant and Team India : तू एक लढवय्‍या आहेस : हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या म्‍हणाला की, " ऋषभ तू लवकरात लवकर बरा व्‍हावास, अशी इच्‍छा आहे. तू एक लढवय्‍या आहेस. सध्‍या तरी तुला हवा तशा गोष्‍टी घडत नाहीत. जीवनामध्‍ये असे चढ-उतार येतच असतात. तू सर्व आव्‍हानावर मात करु परत येशील. माझे प्रेम आणि शुभेच्‍छा नेहमी तुझ्‍यासोबत आहेत. संपूर्ण क्रिकेट संघ आणि देश तुझ्‍यासोबत आहे."

तू लवकर परत येशील : सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव याने म्‍हटलं आहे की, ऋषभ तू लवकरात लवकर बरे व्हावेस यासाठी शुभेच्‍छा. येथे सर्वांना तुझी खूप आठवण येते. मला माहीत आहे की तू लवकर परत येशील.

युजवेंद्र चहलने म्‍हटलं आहे की, ऋषभ तू लवकर बरा हो, आपण एकत्र चौकार आणि षटकार मारू." यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि सलामीवीर शुभमन गिल यांनीही ऋषभला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गिलने म्‍हटलं आहे की,  "भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. आम्हा सर्वांना माहीत आहे की, तू आम्‍हाला लवकर भेटशील."

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT