Latest

TATA IPL: राजस्थान रॉयल्सला झटका, 10 कोटींचा ‘हा’ गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : TATA IPL RR: आयपीएलचा आगामी हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी (दि.17) आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एकेकाळच्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आयपीएलमधून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.

कृष्णा पाठीच्या दुखापतीमुळे कृष्णा बऱ्याच दिवसांपासून खेळापासून दूर आहे. याच समस्येमुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. कृष्णा ऑगस्ट 2022 मध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता आणि 'स्ट्रेस फ्रॅक्चर'साठी 'पुनर्वसन' प्रक्रियेतून जात आहे. (TATA IPL RR prasidh krishna ruled out of ipl 2023)

फ्रँचायझी आरआरने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर कृष्णाला तंदुरुस्त होण्यासाठी बराच वेळ लागेल. आयपीएलच्या आगामी हंगामात तो खेळू शकणार नसल्याचे त्याने फ्रँचायझीला सांगितले आहे. दरम्यान, कृष्णाच्या जागी पर्यायी खेळाडूची मागणी केली जाईल. लवकरच या बदलाची घोषणा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. संघात अजूनही कुलदीप सेन, कुलदीप यादव, नवदीप सैनी, केएम आसिफ, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट आणि जेसन होल्डरसारखे वेगवान गोलंदाज आहेत. (TATA IPL RR prasidh krishna ruled out of ipl 2023)

कृष्णाच्या नावावर 17 सामन्यात 19 विकेट

2022 च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज प्रमुख कृष्णालाला 10 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने 17 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या आणि फ्रँचायझीचा विश्वास संपादन केले. गेल्या हंगामात राजस्थानने 2008 नंतर प्रथमच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण, विजेतेपदाच्या लढतीत त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

IPL 2023 : पहिला सामना गुजरात विरुद्ध चेन्नई

आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पंड्याला पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे आव्हान असेल. 28 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. उद्घाटन आणि अंतिम दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. राजस्थान संघ 2 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

स्पर्धेत एकूण 74 सामने

52 दिवसांत 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. 18 डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण 12 मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT