तापसी पन्नू फाईल फोटो 
Latest

DoBaaraa Trailer : तापसी ‘दोबारा’तून धडक देणार, ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची दमदार अभिनेत्री तापसी पन्नूने चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत आणि आता ती पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. अलीकडेच त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तापसी पन्नू लवकरच 'दोबारा' या चित्रपटात दिसणार आहे. दोबाराचा ट्रेलर (DoBaaraa Trailer) रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पडद्यावर येताच चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ निर्माण झाली आहे. (DoBaaraa Trailer)

सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अनुराग कश्यप 'दोबारा' चित्रपटाची निर्मिती करत आहे. ही मर्डर मिस्ट्री असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. ट्रेलरमध्ये, तापसी तिच्या कुटुंबासह एका घरात जाते. जिथे तिला काही विचित्र गोष्टी दिसतात. त्यांना एक जुना टीव्ही दिसतो आणि त्यात एक मुलगा दिसतो, जो तिच्या आयुष्याशी जोडलेला असतो.

हा हॉरर चित्रपट नसून मर्डर मिस्ट्री आहे. लोक या चित्रपटाचे शीर्षक पुन्हा वाचत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे टायटल '२:१२' असे आहे. या दोन्ही अंकांची या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका आहे, हे हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. या चित्रपटाचा रनटाईम देखील '२.१२' आहे. म्हणजेच हा चित्रपट २ तास १२ मिनिटांचा आहे.

हा चित्रपट १९ ऑगस्ट, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या चित्रपटातील हत्येचे रहस्य पाहण्यासाठी आतुर आहेत. तापसी पन्नूबद्दल बोलायचे झाले तर, निवडक चित्रपट तिच्या नावावर आहेत. हटके चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. बॉलिवूडचं नाही तर साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमध्येही तिचा बोलबाला आहे.

हेदेखील वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT