पुढारी ऑनलाईन : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (दि.२४) तमिळनाडूत ५० ठिकाणी छापेमारी केली. जी स्क्वेअर (G Square) रिअल्टर्स या खासगी कंपनी संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे. या कंपनीचा तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाशी संबंध असल्याचा आरोप केल्याने, सत्ताधारी द्रमुक पक्ष अडचणीत आला आहे.
तामिळनाडूतील डीएमके (DMK) संबंध असलेल्या रिअल इस्टेट फर्मच्या जागेवर आयकरमधील आयटी विभागाने आज छापे टाकले. दरम्यान आयटी विभागातील अधिकाऱ्यांकडून जी स्क्वेअर या रिअल इस्टेट कंपनीच्या मालमत्तांची झडती घेतली जात आहे. या रिअल इस्टेट कंपनी संदर्भात तमिळनाडूत अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास ५० ठिकाणी शोध सुरू आहे.
जी स्क्वेअर ही रिअल इस्टेट कंपनी राजकीय वादात अडकली होती. येथील विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी द्रमुकच्या प्रमुख नेत्यांवर राज्यात या रिअल इस्टेट कंपनीला वेगाने वाढण्यास मदत केल्याचा आरोप केला होता. आयकर विभागाच्या कारवाईमुळे तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.
जी स्क्वेअर या रिएल इस्टेट कंपनीत शेअरहोल्डर असलेल्या अण्णा द्रमुकचे आमदार एमके मोहन यांच्या मुलाच्या घरावर देखील आयकराने छापे टाकले. यानंतर संतप्त डीएमके कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत छापेमारीचा निषेध केला आहे.