पुढारी ऑनलाईन डेस्क : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के पोनमुडी यांना आज ( दि.२१) मद्रास उच्च न्यायालयाने तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला.
2002 मध्ये पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालय (DVAC) खटला दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये दोघांचे उत्पन्न 1.4 कोटी रुपये होते, असा आरोप होता. त्यावेळी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक आढळले. 1996-2001 दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री असताना बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 28 जून रोजी, वेल्लोर येथील मुख्य सत्र न्यायालयाने पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला या खटल्यातून दोषमुक्त केले होते. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली होती.
या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, के. पोनमुडीची सुटका होईल, असा विश्वास द्रुमकचे नेते एनआर एलांगो यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा :