आखरी सचमध्ये तमन्ना भाटिया आयपीएस अधिकारीच्या भूमिकेत  
Latest

क्राईम-थ्रिलर ‘आखरी सच’मध्ये तमन्ना भाटिया आयपीएस अधिकारीच्या भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटियाने रॉबी ग्रेवालच्या 'आखरी सच' मध्ये लेडी कॉप म्हणून पदार्पण केलं आहे. आता डिस्ने+हॉटस्टारवर आलेल्या आखरी सचमध्ये ती एक महिला पोलिस अधिकारी म्हणून चमकली आहे. क्राईम-थ्रिलर सीरिज दिल्लीतील 'बुरारी केस' वर आधारित आहे तिचे पहिले दोन आकर्षक भाग रिलीज झाले आहेत.

या वेब सीरिजला सोशल मीडिया वर खूप प्रेम मिळत आहे. DisneyPlusHotstar ने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय-"The crime scene is a chilling masterpiece, aur ab yeh Investigating officer Anya ki duty hai ki Aakhri Sach bahar aaye."

सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे-तमन्ना तिच्या शिखरावर असताना पुन्हा एकदा थ्रिलर वेब सिरीज घेऊन आली आहे.

निर्विकार फिल्म्स निर्मित "आखरी सच' ही लेखक सौरव डे यांनी रचलेली आकर्षक वेब सीरिज आहे. अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग आणि इतरांसारख्या प्रतिभांसोबत तमन्ना भाटिया अभिनीत, ही मालिका आता Disney+ Hotstar वर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांसह प्रवाहित होत आहे. 'आखरी सच' नंतर, तमन्ना तामिळमध्ये अरनामनाई 4, मल्याळममध्ये बांद्रा आणि हिंदीमध्ये वेदा यांसारख्या आगामी प्रोजेक्टमध्ये चमकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT