पुढारी ऑनलाईन: तैवानची पूर्व किनारपट्टी आज ( दि. १५) ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरली. याचे धक्के राजधानी तैपेईमध्येही जाणवले, अशी माहिती हवामान खात्याने दिली. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा Hualien काउंटीच्या किनारपट्टीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सहा किलोमीटरच्या खोलीवर होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले असल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. (Taiwan Earthquake )
तैवान बेट टेक्टॉनिक प्लेट्सच्या मुख्य केंद्रावर असल्याने येथे नियमितपणे भूकंपाचे धक्के बसतात. ६ रिश्टर किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे काही भूकंप प्राणघातक ठरू शकतात. भूकंप कुठे होतो आणि किती खोलीवर होतो यावर बरेच काही अवलंबून असते. वृत्तसंस्था 'एएफपी'ने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तैपेईमधील हादरे या वर्षीच्या मागील भूकंपांपेक्षा कमी तीव्रतेने जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
सप्टेंबर, २०२२ मध्ये तैवानच्या पूर्व किनार्यावर ६.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा जोरदार हादरा बसला होचा. यामध्ये शहरातील काही इमारती कोसळल्या तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. या भूकंपात मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
हेही वाचा :