Latest

T20 World Cup : भारत-ऑस्ट्रेलिया आज सराव सामना

Arun Patil

दुबई ; वृत्तसंस्था : (T20 World Cup) गेल्या सराव सामन्यात चमक दाखविणार्‍या भारतीय संघाचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या दुसर्‍या आणि शेवटच्या सराव सामन्यांत भारताचा प्रयत्न आपला फलंदाजी क्रम निश्चित करण्याचा असेल. भारताला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना रविवारी पाकिस्तान संघाशी खेळायचा आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची स्पर्धा असणार आहे.

सोमवारी इंग्लंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यापूर्वीच शीर्ष तीन स्थान निश्चित असल्याचे कोहलीने सांगितले होते. ज्यामध्ये के. एल. राहुल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील व कोहली तिसर्‍या स्थानी फलंदाजीला उतरेल. इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताने सात विकेटस्ने विजय मिळवला. यामध्ये ईशान किशनने 70 धावांची खेळी केली होती. (T20 World Cup)

ऋषभ पंतला (नाबाद 29) सूर्यकुमार यादवच्या वरती पाठविण्यात आले होते आणि त्यामुळे तो बुधवारी कुठल्या स्थानी फलंदाजी करेल हे पहावे लागेल. रोहितने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली नाही. त्यामुळे यावेळी तो फलंदाजीस उत्सुक असेल.

इंग्लंडविरुद्ध हार्दिक पंड्या लयीत दिसला नाही. त्यामुळे या लढतीतदेखील त्याच्यावर नजरा असणार आहेत. तो गोलंदाजी करत नसल्याने भारताला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवेल. इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वर कुमारने एक विकेट मिळवली. तर, जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्मात आहे. मोहम्मद शमीनेदेखील तीन विकेटस् मिळवले.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका पराभूत झाल्यानंतर भारताने सलग आठ मालिकेत विजय नोंदवले आहेत. टी-20 विश्वचषक 2016 नंतर भारताने 72 टी-20 सामने खेळून 45 विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने विजयाने सुरुवात करत पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडला तीन विकेटस्ने पराभूत केले. डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म आयपीएलनंतर येथेही सुरूच राहिला. अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र, मध्यक्रमातील फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. (T20 World Cup)

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन एगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंगलिस, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT