Swapnil Joshi : अरे स्वप्नील, तू धोतरातला जेम्स बाॅन्ड दिसतोय !!!  
Latest

Swapnil Joshi : अरे स्वप्नील, तू धोतरातला जेम्स बाॅन्ड दिसतोय!

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीकडे (Swapnil Joshi) पाहिलं जातं. त्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. तो सोशल मीडियावरही चांगला सक्रिय असतो. मात्र, त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण, या फोटोमुळे नेटकऱ्यांनी त्याला चाललाच ट्रोल केलेला आहे.

खरंतर या फोटोमध्ये स्वप्नीलने (Swapnil Joshi) फॅन्सी कुर्ता आणि काळ्या रंगाचा पायजमा घातलेला आहे. त्याचबरोबर एका विशिष्ट पोज देऊन उभा देखील आहे. पण, त्याचा हा ड्रेस नेटकऱ्यांना आवडेला दिसत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी स्वप्नीलची चांगलीच टर उडवलेली दिसत आहे. स्वप्नीलच्या कुर्त्यावरून नेटकऱ्यांनी चित्र-विचित्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

स्वप्नीलने त्या फोटोला I see myself as sexy… दिलं आहे. स्वप्नीलने परिधान केलेला फॅन्सी कुर्ता आणि फोटोची कॅप्शन यावरून त्याला समिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. फोटोपेक्षा काॅमेंट्समुळे स्वप्नील जोशीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अशा आल्या आहेत काॅमेंट्स…

स्वप्नीलचा कुर्ता परिधान केलेला हा फोटो पाहून नेटकरी म्हणतात, "बेडशीट गुंडाळून त्याला काळी पीन लावली आहे, असं वाटतं. स्वप्नील तुला रणवीर सिंग भेटला का… अरे तू धोतरातला जेम्स बाॅन्ड दिसतोय… भगव्या रंगाचा कुर्ता मिळतो का ते बघ आणि सन्यास घे… हा प्रेग्नसी गाऊन वाटतोय… गाडीचं कव्हर घालून कुठं फिरताय… गरिबांचा शाहरूख… सर पडद्याच्या कापडाचा ड्रेस शिवल्याबद्दल शिवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…", अशा सगळ्या भन्नाट काॅमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

स्वप्नीलच्या हा फोटोवर खूपच हास्यास्पद काॅमेंट्स आल्या आहेत. काही काॅमेंट्स खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या दिसतात. स्वप्नीलचा फोटोतील लूक पाहून नेटकरी पुढे म्हणतात की, "स्वप्नील खरंच तुझा हा ड्रेस चांगला दिसत नाही, तू डिझायनर बदल… कुठे शिवून मिळतो हा ड्रेस…शिंपल्याचे शोपीस नको; जीव अडकला घागऱ्यात… सर तुमचा डिझाईनर फसवतो आहे तुम्हाला, त्यामुळे काळजी घ्या…", असेही उपहासात्मक काॅमेंट्सही स्वप्नीलला नेटकऱ्यांनी दिलेल्या आहे.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT