Supriya Sule  
Latest

Supriya Sule : राज्य देवाच्या भरवशावर, सरकार घरे फोडण्यात व्यस्त : सुप्रिया सुळे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सोमवारी (दि.२) वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात भेट दिली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देत महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना सरकारवर घणाघाती हल्ला केला. यावेळी त्या बोलत असताना म्हणाल्या,"राज्य देवाच्या भरवशावर चाललंय, सरकार घरे फोडण्यात व्यस्त" (Supriya Sule)

महाराष्ट्रात २०० आमदार, ३०० खासदर आहेत. पण लोकांची कामे कधी होणार आहेत असा सवाल करत त्या म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. शेतकऱ्यांच अश्रू पुसायला, दु:ख जाणून घ्यायला वेळ नाही. पुढे बोलत असताना त्या असही म्हणाल्या की, आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. सरकार सर्वसामान्य जनतेपासून, वास्तवतेपासून दूर आहे. असा घणाघाती हल्ला केला.

Supriya Sule : न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू

वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित काम करण्याची संधी मिळाली तर आनंदच होईल. अर्थातच तो निर्णय संघटना ठरवेल. स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी नाही मिळाली तरी अनेक पद्धतीने आपण काम करू शकतो. वर्ध्यासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

वर्ध्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समीर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे पुढे यांनी सरकारचा कंत्राटी पदभरतीचा जीआर काढल्याबद्दल निषेध नोंदविला. वाघ नख वगैरे करा पण, सोयाबीन, कपाशीवरही चर्चा करा. आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात, कपाशीला बारा हजार रुपये भाव देण्यास कटीबद्ध राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT