पुढारी वृत्तसेवा : 'सुपर फ्लॉवर ब्लड मून' म्हणून ओळखले जाणारे वैशिष्टपूर्ण चंद्रग्रहण सोमवार (१६ मे) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 ते 9.30 च्या दरम्यान हे ग्रहण सर्वाधिक दृश्यमान असणार आहे. जगाच्या अनेक भागातून दिसणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
संपूर्ण ग्रहणाच्या वेळी चंद्राला लालसर चमक असणार असून, ग्रहणाच्या वेगवेगळ्या क्षणांमध्ये चंद्र केशरी, पिवळा किंवा तपकिरी छटा घेत असल्यासारखे देखील दिसू शकणार आहे.
साेमवारी ( दि. १६ ) पौर्णिमेच्या दिवशी चंद्र लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने तो "सुपरमून" असेल, याक्षणी पूर्ण चंद्रग्रहणदेखील असणार आहे. त्यामुळे चंद्र "ब्लड मून" सारखा असेल, जगाच्या काही भागांमध्ये वसंत ऋतूतल्या पौर्णिमेला "फ्लॉवर मून" असेही म्हटले जाते, त्यामुळे या चंद्रग्रहणाला 'सुपर फ्लॉवर ब्लड मून' म्हटले जाते.
हेही वाचलंत का?