पुढारी ऑनलाइन डेस्क : Summer Fashion Trends : उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस खूप वाढत चालले आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 35 च्या वर आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. अशा हैराण करणाऱ्या उकाड्यात जीन्स, वेल्वेट, किंवा लेगिन्स्ज आणि अन्य कपडे वापरणे खूप कठीण असते. अनेकांना तर यामुळे घामोळ्या, खाज येणे अशा प्रकारचे त्रासही होतात. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्हाला तापमानाशी जुळवून घेत कूल आणि स्टायलिश दिसायचे आहे का?
कडाक्याच्या उन्हाळ्यात खादीचे कापड हे त्वचेला आरामदायी आणि कूल ठेवते. मात्र, अनेकांना खादीच्या कापडात स्टाईलिश कसे दिसायचे असा प्रश्न पडतो. अशांनी काळजी करू नये. कारण फॅशनच्या दुनियेने याला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बाजारात सध्या खादीच्या स्ट्रेचेबल आणि कन्फर्टेबल फिल देणाऱ्या पँट्स आल्या आहेत. यामध्ये 80 टक्के खादी आणि 20 टक्के स्ट्रेचेबल मटेरियल असते. उन्हाळ्यात या पँट्स घाम शोषून घेणाऱ्या आणि आरामदायी असतात. तसेच या पँट्सवर तुम्ही प्रिंटेड फ्लॉवर डिझाइनचे शॉर्ट कुर्ते घालू शकता. त्यामुळे तुमचा लूक एकदम कूल वाटतो.
उन्हाळ्यात किंवा अन्य कोणत्याही ऋतूत घालण्यासाठी सर्वोत्तम फॅशनेबल पँट्स म्हणजे सिगार पँट्स. या सिगार पँट्सची मार्केटमध्ये सध्या चलती आहे. या सिगार पँट्स तुम्हाला प्लाझो, सेमी प्लाझो पॅटर्नमध्ये देखील मिळतात. तसेच या विविध रंगात आणि नक्षीत उपलब्ध असल्याने या पँट्स लेगिन्सला पर्याय म्हणून वापरू शकता. यावर तुम्ही छान थोटे प्लेन किंवा प्रिंटेड टी शर्ट्स वापरू शकता. किंवा कार्यालयात जायचे असेल तर सेमी शॉर्ट कुर्ता किंवा लाँग कॉटन कुर्ते दोन्ही वापरू शकता. हे डोळ्यांना पाहण्यासाठी आल्हाददायक जाणवते.
उन्हाळ्यात तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल आणि त्यात तुम्हाला तुमचा लूक स्टाईलिश दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही कॉटन स्कर्ट, शर्ट आणि हॅट यासोबत गॉगल असा पेहराव करू शकता. कॉटनचे थ्री फोर्थ स्कर्ट त्यावर ब्राईट रंगांचे शर्ट्स तुम्हाला ग्लॅमरस लूक देतात. तसेच कॉटन देखील खादीप्रमाणेच त्वचेला आरामदायी आणि उकाडा कमी करणारे असतात.
या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक पर्याय उपलब्ध असतो. तो म्हणजे कॉटन वन पीस किंवा एथनिक वेअर. कॉन वन पीस किंवा एथनिक वेअर हे उन्हाळ्यात तुम्हाला खूच कूल ठेवतात. याची आकर्षक रंगसंगती आणि पारंपारिक वारली किंवा अन्य नक्षीकाम तुमच्याकडे लक्ष वेधते. हे कॉटन वन पीस तुम्हाला उन्हाळ्यातही हवेशीर ठेवतात. त्वचेचे तापमान वातावरणाशी मॅच करतात. तसेच उन्हाळ्यात थोडे संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही बाहेर फिरायला निघाला तर या कॉटन वन पीसवर एक छोटा स्टोल हॅट जोडीला गॉगल आणि हाय हील सँडल, घातली की तुमचा लूक एकदम आकर्षक आणि दिलखेचक इतरांना भूलवणारा होतो. तेव्हा एकदा तरी तुम्हाला हे ट्राय करायलाच हवे.
हे ही वाचा :