Latest

Sudhakar Badgujar : पोलिस दबावाखाली काम करताय, खोटे गुन्हे दाखल करताय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. त्यांच्यासह दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना, पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असून माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास एसीबीसमोर जाहीर आत्महत्या करेल असा इशाराच आता बडगुजर यांनी दिला आहे. 

बडगुजर यांनी आज पुन्हा पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.  पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असून शिवसैनिकांवर अन्याय करण्याच्या हेतुने खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. पोलिसांनी योग्य पडताळणी केली पाहीजे. गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला हवी, आमचे म्हणणे ऐकुन घ्यायला हवे, मात्र आधी गुन्हे दाखल करायचे मग नोटीस बजावयची असे उलट काम सुरु असल्याचा घणाघात बडगुजरांनी केला. सगळ्याच पोलिसांवर नसला तरी काही पोलिसांवर नक्कीच दबाव आहे.  पोलिस यंत्रणेला विनंती आहे, की त्यांनी दबावाखी येऊन खोटे गुन्हे दाखल करु नये.

म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्यालय सील करण्यात आले त्यावेळेलाही पोलिसांनी आमच्यावरच कारवाई केली. आमची बदनामी केली आणि नंतर पोलिसांनी केस मागे घेतली. 53 वर्षाच्या राजकारणात माझ्यावर साधी एनसीही दाखल नाही, पण आता दबावाखाली येवून ओढून ताणून कोणत्या न कोणत्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. सत्तेचा उन्माद जास्त काळ चालत नाही, पोलिसांनीही दबावाखाली येऊ नये असे बडगुजर म्हणाले.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुधाकर बडगुजर यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची रविवारी (दि.१८) रात्रीपर्यंत झडती घेतली. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील इतर दोन संशयितांच्या निवासस्थानीही विभागाने झडती घेतली. झडतीत काय आढळले याबाबत विभागाने माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT