मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतिक्षित वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान शुक्रवारी पूर्ण झाली. अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल असे एकूण ४९३ किलोमीटरचे अंतर या एक्स्प्रेसने अवघ्या सव्वापाच तासांत पूर्ण केले. या यशस्वी चाचणीमुळे ऑक्टोबर २०२२ नंतर ही गाडी पश्चिम रेल्वेवर प्रवाशांसाठी धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी अहमदाबाद स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दुपारी १२ वाजून १९ मिनिटांनी ती मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी या गाडीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि संध्याकाळी ६ च्या सुमारास ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकात पोहोचली. या यशस्वी चाचणीनंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होणार असून एकूण साडेपाच तासांत ही गाडी अंतर कापेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :