Latest

Mission LVM3 M3 | श्रीहरीकोटा येथून ‘बाहुबली’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: इस्रो'तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 3' (लाँच व्हेईकल मार्क 3) या बाहुबली रॉकेटचे दुसरे प्रक्षेपण आज (दि.२६) यशस्वीरित्या करण्यात आले.  36 उपग्रह वाहून नेणारे भारतातील हे सर्वात मोठे LVM3 रॉकेट आहे. याचे रविवारी सकाळी ९ वाजता श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झाले. 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2/वनवेब इंडिया २' असे या मोहिमेचे नाव आहे. याचे नुकतेच प्रक्षेपण झाल्याची माहिती इस्रोने ट्विट करून दिली आहे.

Mission LVM3 M3: यापूर्वी पहिल्या टप्प्याचे प्रक्षेपण

२३ ऑक्टोबर रोजी 'इस्रो'तर्फे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2' (लाँच व्हेईकल मार्क 3) या बाहुबली रॉकेटमधून तब्बल 36 उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले होते. 'एलव्ही एमव्हीएम 3 एम 2/वनवेब इंडिया 1' असे या मोहिमेचे नाव होते. 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड' आणि ब्रिटनमधील 'वनवेब' या स्टार्टअप कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतील सर्व उपग्रह कॅप्सूलमध्ये बसविण्यात आलेले आहेत.

Mission LVM3 M3: वैशिष्ट्ये

आतापर्यंत इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार रॉकेटचा हा दुसरा टप्पा आहे. या मिशनमध्ये वापरण्यात आलेले रॉकेट हे सर्वात वजनदार असल्याने त्याला बाहुबली रॉकेट असे म्हटले आहे. या कंपनीत एअरटेलची भारती एंटरप्रायजेस कंपनी ही शेअर होल्डर्स आहे. उपग्रहाचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक आहे कारण, इस्रोकडून प्रक्षेपित होणारे हे पहिलेच व्यवसायिक प्रक्षेपण आहे.  या रॉकेटचा वापर पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपणासाठी करण्यात योत आहे. 'वनवेब' ही एक खासगी उपग्रह कंपनी आहे. या प्रक्षेपणासह न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या आपल्या व्यावसायिक शाखेच्या माध्यमातून इस्रोने जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारामध्ये पाऊल टाकले आहे.

या ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे यूजर्संना कम्युनिकेशन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी या कंपनीने पृथ्वीच्या कक्षामध्ये ६५० उपग्रह (MissionLVM3 M2)  ठेवण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT