Latest

Strike MSRTC : कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक, चालक जखमी

रणजित गायकवाड

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : Strike MSRTC : आतापर्यंत तासगाव तालुक्यात शांततेत सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. विटा आगाराच्या विटा – सांगली बसवर सोमवारी सायंकाळी कवठेएकंद गावाच्या हद्दीत अज्ञातांनी दगडफेक केली आहे. यामध्ये बसचा चालक किरकोळ जखमी झाला.

तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रवाशांची सोय करण्यासाठी काही मार्गावर बससेवा सुरु केली आहे. यामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर एस. टी. च्या संपकरी कर्मचा-यांचा रोष आहे.  सरकार एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता सदर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत कर्मचारी आक्रमक बनले आहेत.

सोमवारी सायंकाळी विटा आगाराची विटा-सांगली (एमएच 20 डी 9152) ही बस पोलीस बंदोबस्तात संगलीकडे निघाली होती. या बसवर कवठेएकंदजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. बसची पुढील बाजूची व खिडकीची काच फुटली आहे. या दगडफेकीत बसचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT