बारामती: पुढारी वृत्तसेवा : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 'सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा' अशा घोषणांनी मराठा आंदोलकांनी बारामती दणाणून सोडली आहे. मराठा संघटनांनी आज बारामती बंदची हाक दिली असून मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. याचवेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांच्यासंबंधी या अशा घोषणा दिल्या आहेत.
हेही वाचा :