Latest

Stock Market Updates | संमिश्र जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांचा मागोवा घेत आज गुरुवारी सेन्सेक्स (Sensex), निफ्टीने (Nifty) सावध सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सुरुवातीला BSE सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ६२,७०० वर होता. तर निफ्टी १८,५४७ वर होता. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर भारती एअरटेल आणि कोटक बँक यांचे शेअर्स घसरले होते. हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. पॉ‍वर ग्रिड, मारुती, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स हेदेखील लाल चिन्ह्यात खुले झाले आहेत. तर एचयूएल, एशियन पेंट्स, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी यांचे शेअर्स वाढले आहेत.

निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा आज वाढले आहेत. पण निफ्टी बँक आणि फायनान्सियल स्टॉक घसरले आहेत.

कोल इंडियाचे शेअर्स गडगडले, जाणून घ्या कारण

कोल इंडियाचे शेअर्स (Shares of Coal India) ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कारण केंद्र सरकार गुरुवारपासून दोन दिवसांच्या ऑफर-फॉर-सेल (OFS) द्वारे सुमारे ४,२०० कोटी उभारण्यासाठी कोल इंडियामधील त्यांच्या ३ भागभांडवलाची विक्री करणार आहे. या पार्श्वभूमीवर Coal India चे शेअर्स गडगडले आहेत.

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईची चिंता वाढल्याने अमेरिकेतील शेअर बाजार काल बुधवारी घसरून बंद झाले. एस अँड पी, नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq composite), डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) हे निर्देशांक खाली आले आहेत. पण आशियाई बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग हे वधारले आहेत.

जीडीपीचे आकडे चांगले

सरत्या आर्थिक वर्षात ७.२ टक्के इतक्या जीडीपी दराची नोंद झाली असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) बुधवारी देण्यात आली. तत्पूर्वीच्या म्हणजे वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी दर ९.१ टक्के इतका नोंदवला गेला होता. सरकारकडून जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीचे आकडेही जाहीर करण्यात आले असून या तिमाहीत जीडीपी दर ४.४ टक्क्यांच्या तुलनेत ६.१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. सरत्या आर्थिक वर्षात जीडीपी दर साडेसहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे भाकीत रिझर्व्ह बँकेने वर्तवले होते. त्या तुलनेत जीडीपीचे आकडे चांगले आल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT