Stock Market Opening : सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सोमवारी (दि.१०) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १७७ अंकांनी वाढून ६० हजांरावर पोहोचला. तर निफ्टी १७,६०० च्या वर आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सचा शेअर्स सर्वाधिक ६ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. Tata Motors ने शुक्रवारी आर्थिक चौथ्या तिमाहीत ३,६१,३६१ युनिट्स जॅग्वार लँड रोव्हरसह (JLR) घाऊक विक्रीत वार्षिक ८ टक्क्यांची वाढ नोंदवली. यामुळे टाटा मोटर्स शेअर्स वधारले आहेत.
त्यासोबतच टायटन, एलटी, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, विप्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, आयटीसी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक, टीसीएस, टेक महिंद्रा हे शेअर्सही वधारले आहेत. अदानी समुहातील अदानी पॉवर हा शेअरदेखील १.४६ टक्क्याने वाढला आहे. (Stock Market Opening)
हे ही वाचा :