पुढारी ऑनलाईन : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २४) शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली आहे. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून ५९,८०० वर खुला झाला आहे. तर निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह १७,६६० वर होता. सुरुवातीच्या व्यवहारात आयसीआयसीआय, रिलायन्स, विप्रो, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, टायटन, एनटीपीसी हे वधारले होते. तर सन फार्मा, टीसीएस, आयटीसी, मारुती, इन्फोसिस, टाटा मोटर्स हे शेअर्स लाल चिन्ह्यात व्यवहार करत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC Life Insurance हे शेअर्सही वाढले आहेत. (Stock Market Opening Bell)
IndusInd Bank, Bank of Maharashtra, Persistent Systems आणि अन्य काही कंपन्या आज त्यांचे तिमाही उलाढालीचे निकाल जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार दिसून येत आहे. इतर आशियाई बाजारांतही आज कमजोरी दिसून येत आहे. (Stock Market Opening Bell)
दरम्यान, व्याजदरवाढीच्या चिंतेने कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. ब्रेंट क्रूड दरात ०.६ टक्के घट होऊन दर प्रति बॅरेल ८१.१८ डॉलरवर पोहोचला. तर सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २ पैशांनी घसरून ८२.०८ वर आला.
हे ही वाचा :