Latest

Stock Market Closing | RBI च्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ६३,१४२ वर बंद

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात बुधवारी सलग चौथ्या सत्रात तेजी राहिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आणि इतर प्रमुख मध्यवर्ती बँका व्याजदराला विराम देतील या शक्यतेने बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. आज सेन्सेक्स (Sensex) ३५० अंकांनी वाढून ६३,१४२ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १२७ अंकांच्या वाढीसह १८,७२६ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

आरबीआयने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत. यामुळे आज शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. बाजारातील तेजीत आज FCMG आणि रिएल्टी स्टॉक आघाडीवर राहिले. त्याशिवाय बँकिंग, फायनान्सियल आणि हेल्थकेअर स्टॉक्समध्येही खरेदी दिसून आली. तसेच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्सही आज वधारले. (Stock Market Updates)

ब्रिटानिया टॉप गेनर

एफसीएमजी स्टॉक्समध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रिजचा (Britannia Industries) शेअर टॉप गेनर होता. हा शेअर आजच्या व्यवहारात ३ टक्क्यांहून अधिक वाढून ४,८८४ रुपयांवर पोहोचला. Tata Consumer Products, नेस्ले हे शेअर्स आज वाढले.

'हे' शेअर्स वधारले

सेन्सेक्सवर नेस्ले, टाटा स्टील, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एलटी, एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, टायटन हे शेअर्स वाढले. तर कोटक बँक, मारुती, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि एम अँड एम हे शेअर्स घसरले.

अदानी पॉवरच्या शेअरची उसळी

LIC ने टेक महिंद्रातील भागीदारी ६.८६९ टक्क्यांवरून ८.८८४ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर टेक महिंद्राचा शेअर आज वाढून १,०९५ रुपयांवर पोहोचला. व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) चा शेअर आज ८.५१ टक्क्यांनी वाढला. बीएसईने स्टॉकची सर्किट मर्यादा ५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर अदानी पॉवरच्या शेअर्सने आजच्या व्यवहारात सुमारे ५ टक्के वाढून उसळी घेतली.

दरम्यान, आज आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण राहिले. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५ पैशांनी वाढून ८२.५५ वर पोहोचला, आशियाई चलनातील वाढीमुळे रुपयाला मदत झाली आहे. (Stock Market Closing)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT