संग्रहित छायाचित्र 
Latest

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स ५५५ अंकांनी वाढला, ‘हे’ शेअर्स ठरले टॉप गेनर्स

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (fed rate hike) व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या ट्रेडिंग सत्रात मेटल, फायनान्सियल स्टॉक आज तेजीत राहिले. आज शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली होती. त्यानंतर सेन्सेक्सने (Sensex) ५०० हून अधिक अंकांनी वाढून व्यवहार केला. सेन्सेक्स आज ५५५ अंकांनी वाढून ६१,७४९ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १६५ अंकांच्या वाढीसह १८,२५५ वर स्थिरावला. FMCG, रियल्टी वगळता सर्व क्षेत्रांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. Bajaj Finance, HDFC हे आज टॉप गेनर्स होते. (Stock Market Closing Bell)

'हे' होते टॉप गेनर्स

BSE सेन्सेक्सवरील तेजीत आज बजाज फायनान्स (३.५१ टक्के वाढ), एचडीएफसी (२.६३ टक्के वाढ), एचडीएफसी बँक (२.१८ टक्के वाढ), बजाज फिनसर्व्ह (२.१८ टक्के वाढ), एशियन पेंट्स (१.८७ टक्के वाढ), एसबीआय (१.७० टक्के वाढ) हे टॉप गेनर्स होते. त्यासोबतच टीसीएस, रिलायन्स, भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, कोटक बँक हे शेअर्सदेखील वधारले होते. इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, विप्रो, एम अँड एम, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, आयसीआयसीआय हे शेअर्स घसरले होते.

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर वाढला

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत आज ४ टक्क्यांपर्यंत वाढून १,९१२ रुपये प्रति शेअर झाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे गेल्या काही महिन्यांत अस्थिरता दिसून आली होती. आता हा शेअर वधारत असल्याचे दिसून येत आहे.

HDFC चा नफ्यात वाढ, शेअर्स वधारले

चौथ्या तिमाहीत एचडीएफसीचा नफा वार्षिक ३,७०० कोटींवरुन ४,४२५ कोटींवर पोहोचला. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ने स्टँडअलोन निव्वळ नफ्यात १९.५९ टक्के वाढ नोंदवली असून मार्च अखेरच्या तिमाहीत नफा ४,४२५ कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी ३,७०० कोटी होता. दरम्यान, HDFC चा शेअर आजच्या ट्रेडिंग सत्रात २ टक्क्यांहून अधिक वाढला. (Stock Market Closing Bell)

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय बाजारात सलग पाचव्या सत्रात निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. त्यांनी १,३३८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT