पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज शुक्रवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी व्यवहार केला. बाजारात आज चौफेर खरेदी पाहायला मिळाली. विशेषतः बँकिंग स्टॉक्समध्ये अधिक तेजी राहिली. सेन्सेक्स (Sensex) ४६६ अंकांनी वाढून ६३,३८४ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १३७ अंकांनी वाढून १८,८२६ वर स्थिरावला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ विलंबाने करेल असे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार सुखावले आहेत. यामुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. (Stock Market Closing)
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, टायटन, कोटक बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स, एसबीआय, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय हे शेअर्स वाढले. तर टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (Stock Market Updates)
कल्याण ज्वेलर्सचा (Kalyan Jewellers shares) शेअर शुक्रवारी NSE वर जवळपास १३ टक्के वाढून १२८.६० रुपयांवर पोहोचला. सकाळच्या सत्रात या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. दुपारच्या सत्रात या शेअरने १२५ रुपयांवर व्यवहार केला. कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स शुक्रवारच्या व्यवहारात झपाट्याने वाढले आणि मोठ्या ब्लॉक डीलच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या सत्रात त्यांचा नफा वाढला. हा शेअर ११४.३० रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत आज १३.३४ टक्क्यांनी वाढून १२९.५५ रुपयांच्या दिवसातील उच्चांकावर पोहोचला. कल्याण ज्वेलर्सच्या ६ कोटींहून अधिक इक्विटी शेअर्सचा ब्लॉक डीलमध्ये व्यवहार झाला. ही उलाढाल कंपनीच्या ६.२ टक्के भागीदारीच्या बरोबरीने आहे. या ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ झाली आहे. तसेच या कंपनीने टीएस अनंतरामन यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे शेअर्स वधारले आहेत.
PSU banking शेअर्समध्ये आज वाढ दिसून आली. यात पंजाब नॅशनल बँक (२.६८ टक्के वाढ), कॅनरा बँक (२.२४ टक्के वाढ), युको बँक (०.७६ टक्के वाढ), बँक ऑफ बडोदा (१.६४ टक्के वाढ), युनियन बँक ऑफ इंडिया (०.५० टक्के वाढ) आदी शेअर्सचा समावेश होता.
फेडरल रिझव्र्ह व्याजदर वाढीला ब्रेक देईल या संकेताने अमेरिकेतील शेअर बाजार गुरुवारी वधारले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) १.३ टक्के वाढला. तर एस अँड पी (S&P 500) ५०० निर्देशांक १.२ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite Index) १.२ टक्के वाढला होता. दरम्यान, आशियाई बाजारातील शेअर्स शुक्रवारी चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. चीनचा निर्देशांक CSI 300 निर्देशांक ०.३ टक्के वाढला आहे. तर हाँगकाँगचा हँगसेंग (Hang Seng) निर्देशांक ०.४ टक्के वाढला. पण जपानचा निक्केई (Japan's Nikkei) आज ०.७ टक्के वाढून ३३,७०६ वर बंद झाला. (Stock Market Closing)
NSE डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी ३,०८६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (domestic investors) २९८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
हे ही वाचा :