पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. श्रीलंकाने ५० ओव्हरमध्ये नऊ गडी गमावून ३४४ धावा केल्या. यामध्ये कुसल मेंडिन्सने सर्वाधिक १२२ धावा केल्या. त्याचे हे वनडेतील तिसरे शतक आहे. सदीरा समरविक्रमाने १०८ धावांची खेळी केली. त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या दोघांशिवाय पथुम निसांकाने ५१ धावांचे योगदान दिले. धनंजय डी सिल्वाने २५ धावा, कर्णधार दासुन शनाकाने १२ धावा आणि दुनिथा वेललागेने १० धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अलीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हरिस रौफला दोन विकेट घेतल्या तर, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (PAK vs SL)
हेही वाचा :