Latest

Gautam Gambhir vs Sreesanth : गाैतम गंभीर मैदानावर म्‍हणाला, ‘तू फिक्सर आहेस’; श्रीसंतचा व्‍हिडिओ व्‍हायरल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी क्रिकेटपटू श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. दोन्‍ही खेळाडू मैदानावर भिडले यानंतर सोशल मीडियावर पोस्‍ट करत आरोप-प्रत्‍यारोप करताना दिसत आहेत. लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 सामन्‍या दरम्‍यान गंभीर काय म्‍हणाला याची माहिती देणारा एक व्हिडिओ श्रीसंतने पोस्‍ट केला आहे. यामुळे या दोन्‍ही खेळाडूंमधील वाद आणखी चिघळल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. ( Gautam Gambhir vs Sreesanth )

Gautam Gambhir vs Sreesanth : श्रीसंतने केला व्‍हिडिओ पोस्‍ट

गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गौतम गंभीर काय बोलला याबाबत श्रीसंतने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'अनेक चॅनल मला कॉल करत आहेत आणि माझ्याकडून मैदानावर काय घडले ते जाणून घ्यायचे आहे. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी पीआर (जनसंपर्क) मध्ये खूप पैसे खर्च करते आणि चुकीच्या गोष्टी पसरवते. म्हणूनच मी थेट सोशल मीडियावर व्‍हिडिओ पोस्‍ट करत तुमच्याशी बोलत आहे.

Gautam Gambhir vs Sreesanth : श्रीसंतने केले गंभीरवर 'गंभीर' आरोप

श्रीसंतने व्‍हिडिओ मध्‍ये म्‍हटलं आहे की, आम्हाला माहित आहे की तो ( गौतम गंभीर) किती शक्तिशाली आहे. तो जनसंपर्कावर किती खर्च करू शकतो. मी एक सामान्य माणूस आहे, मी माझ्या कुटुंबासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी एकट्याने लढा दिला आहे. तुम्हा सर्वांचेही सहकार्य लाभले आहे. जगासमोर लाईव्ह टीव्हीवर तो मला फिक्सर फिक्सर म्हणत राहिला. मी त्याला एकही वाईट शब्द बोललो नाही. मी त्याच्यासाठी कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही. मी फक्त त्याला विचारले, तू मला काय सांगत आहेस? आणि मी हसत होतो. कारण तो मला पुन्हा पुन्हा फिक्सर म्हणत होता. तसेच अपशब्द वापरत होता.

पंचांनाही न जुमानता अर्वाच्य भाषेत बोलला

सामन्‍यावेळी गौतम गंभीर मला बोलत असताना पंचांनी हस्‍तक्षेप केला. ते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही पंचांनाही न जुमानता तो अर्वाच्‍य भाषेत बोलत राहिला. कदाचित त्‍यांचा जनसंपर्क मोठा असेल;पण मी प्रत्येक वृत्तवाहिनीवर जावून माझी बाजू मांडू शकत नाही. त्‍यामुळे मी सोशल मीडियावर व्‍हिडिओ पोस्‍ट केला आहे. मैदानावर नेमंक काय घडंल हे तुम्हाला संपूर्ण सत्य सांगितले आहे. सोशल मीडियावर माझ्याविरोधातील कोणताही व्हिडीओ व्हायरल होत असेल, तर त्याची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हे समजावे. मी माझ्या बाजूने एकही शब्द किंवा शिवीगाळ केली नाही, असा दावाही श्रीसंतने केला आहे.

मला हवे असल्यास मी यावर पुढील कारवाई करू शकतो. मला फक्त हे प्रकरण संपवायचे आहे, परंतु त्याचे लोक त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही श्रीसंत याने म्‍हटले आहे.

गंभीरने गुरुवारी सकाळी 11:30 वाजता X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचे हे चित्र आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले- स्माईल! जेव्हा जगातील लोक फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात.

लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्‍यात नेमकं काय घडलं?

लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 मध्‍ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रीशांतच्या चेंडूवर गंभीरने चौकार मारले. तेव्हा श्रीसंतने गंभीर याच्‍याकडे रागाने पाहिले. त्यावरून दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली. दोघेही खेळाडूंनी एकमेकांना खुन्‍नस देत जवळ आले. मात्र, सहकारी खेळाडूंनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केल्‍याने पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT