पुढारी ऑनलाईन डेस्क | IPL 2025 Lucknow Super Giants : आयपीएल 2025 हंगामाची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत आहेत. आगमी हंगामासाठी सर्व संघ तयारी करत आहेत. नव्या हंगामापूर्वी मेगा लिलावही पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये खेळाडूंची देवाणघेवाणही होणार आहे. त्याचबरोबर अनेक संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि मेंटॉरही नव्या मोसमात बदलू शकतात. आता लखनौ सुपर जायंट्सच्या नवीन मेंटॉरबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने लखनौच्या मेंटॉर पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. गौतम गंभीरने लखनौ संघ सोडल्यापासून हे पद रिक्त आहे. यामुळे लखनौला गौतम गंभीरसारख्या अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यामुळे त्यांनी झहीरकडे ही जबाबदारी सोपावली आहे.
लखनौ सुपर जायंट्स आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे, ज्यामध्ये झहीर खानच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. झहीर खान भारताकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळला आहे. झहीरने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी 92 कसोटी, 200 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत.