Yuzvendra Chahal Controversy pudhari
स्पोर्ट्स

Yuzvendra Chahal Controversy: हे पाहा युझवेंद्र चहलने केलेले मेसेज... इन्फ्लुएन्सरने थेट मोबाईल दाखवत केला मोठा दावा

Anirudha Sankpal

Yuzvendra Chahal Controversy: आयपीएल २०२६ मध्ये युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीची फारशी चर्चा नसली तरी तो सध्या मैदानाबाहेरच्या अनेक गोष्टींनी चर्चेत आहे. मध्यंतरी त्याचा गाडीत बसून सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता प्रसिद्ध अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर तान्या चटर्जीचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात व्हिडिओत क्रिकेटर युझवेंद्र चहलबाबत तिने मोठा दावा केला आहे. पत्रकारांशी बोलताना तान्याने तिच्या फोटोवर युझवेंद्र चहलने केलेले मेसेज दाखवत युझवेंद्र चहलची पोलखोल केली.

चहलबाबत मोठा दावा

तान्या पापार्झींना पोज देत होती. त्यावेळी तिने मी अजून कोणालातरी क्यूट वाटते असं सांगितलं. यावेळी पॅप्सनी तिला त्याचं नाव विचारलं. त्यावेळी तिनं युझवेंद्र चहलचं नाव घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ती म्हणाली युझवेंद्र चहलने अनेकवेळा माझी स्टोरी पाहून क्यूट असं म्हटलं आहे. यावेळी पॅप्सनी तान्याला पुरावा दाखवा असं सांगितलं.

त्यानंतर तान्याने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून इन्स्टा स्टोरीचे डीएम दाखवले. यात युझवेंद्र चहलने तिच्या अनेक पोस्टवर प्रतिक्रिया दिलेलं दिसलं. युझवेंद्र चहलच्या अकाऊंटला ब्लू टीक होती. मात्र हे त्याचे खरे अकाऊंट आहे की फेक अकाऊंट आहे याची खातरजमा काही झालेली नाही. तान्याने डीएम दाखवत हे ती प्रमोशनसाठी करत नसल्याचं देखील सांगितलं.

तान्याने रिप्लाय का दिला नाही?

तान्याने सांगितले की तिने क्रिकेट युझवेंद्रचे मेसेज खूप उशिरा पाहिले. त्यामुळं ती त्याला रिप्लाय देऊ शकली नाही. तान्याच्या या दाव्यात किती सत्यता आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र यामुळे युझवेंद्र चहलला ट्रोल करण्याची अजून एक संधी ट्रोलर्सना मिळाली आहे.

कमेंट बॉक्समध्ये युजर्स युझवेंद्रची चांगलीच फिरकी घेत आहेत. काही युजर्सनी यामुळंच याचा घटस्फोट झाला आहे अशी कमेंट केली तर काही युजर्सनी युझवेंद्रच्या आशिकीचे भांडाफोड झालं आहे अशी कमेंट केली. काही युजर्सनी तान्यालाच ट्रोल केलं. ती हे पब्लिसिटीसाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहे असं काहीजण म्हणत आहेत.

अतरंगी तान्या

तान्याची कारकीर्द तशी खास नाहीये. त्यांचे इन्स्टावर २.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती अनेक म्युजिकल व्हिडिओत दिसली आहे. तान्या ही तिच्या अतरंगी कामांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. ती सहसा पॅप्ससमोर पूर्ण कपड्यात येते आणि कॅमेऱ्यासमोर आल्यावर ती एक एक कपडे काढून आपला लूक ट्रान्सफॉर्म करत असते. ती यासाठी ट्रोल देखील होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT