मॅके येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव करत कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन केले. 
स्पोर्ट्स

WTC points table 2026 : ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशचा 'धुव्वा'! WTC गुणतालिकेत भारताला सुवर्णसंधी

टीम इंडिया गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेण्याच्या तयारीत

पुढारी वृत्तसेवा

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर दुसरी कसोटी खेळत आहे. भारताने पहिला सामना १६५ धावांनी जिंकला होता. भारताने ही मालिका २-० अशी जिंकली तर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी ५७.५८ होईल.

WTC points table India standings Australia vs Bangladesh

मॅके येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव करत कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन केले. अवघ्या दोन दिवसांत आटोपलेल्या या सामन्यातील विजयामुळे दोन कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. बांगलादेशच्या या पराभवाचा थेट फायदा भारतीय संघाला WTC गुणतालिकेत मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

सामन्‍यात काय घडलं?

ऑस्‍ट्रेलियान आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्‍यात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्‍या ६४ धावांवर गुंडाळला गेला. यानंतर ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने पहिला डाव २१० धावांपर्यंत मजल मारत १४६ धावांची आघाडी घेतली होती. ऑस्‍ट्रेलियास पहिल्‍या कसोटीत पराभूत करणारा बांगलादेशचा संघ दुसर्‍या डावात पुनरागम करेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात होती. मात्र ऑस्‍ट्रेलियाच्‍या भेदक गोलंदाजीसमोर कोणतेही उत्तर नव्‍हते. बांगलादेशचा दुसरा डावात ३८.३ षटकांत अवघ्या ९५ धावांत धुव्वा उडाला. या सामन्‍यात ऑस्ट्रेलिाच्‍या मिचेल स्टार्कने १० विकेट घेतल्‍या.

WTC गुणतालिकेत भारताला फायदा

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर दुसरी आणि शेवटची कसोटी खेळत आहे. भारताने पहिला सामना १६५ धावांनी जिंकला होता. भारताने ही मालिका २-० अशी जिंकली तर भारताची विजयाची टक्केवारी ५७.५८ होईल. यामुळे भारतीय संघ बांगलादेशला मागे टाकत गुणतालिकेत थेट चौथ्या स्थानावर झेप घेईल. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव करणाऱ्या बांगलादेशची टक्केवारी ६६.६७ वरून थेट ५५.५६ पर्यंत खाली घसरली आहे.

ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान अबाधित!

मॅके येथील विजयानंतर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ७७.७८ वरून ८०.०० वर पोहोचली असून त्यांचे पहिले स्थान अधिक मजबूत झाले आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ १९ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT