WPL 2026 RCB Prize Money pudhari photo
स्पोर्ट्स

WPL 2026 RCB Prize Money: सलग दुसऱ्या विजेतेपदासह RCB ची झाली चांदी... इतक्या कोटींच बक्षीस घातलं खिशात

WPL 2026 RCB Won The Final: RCB ची बक्षीस रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत कितीने वाढली?

Anirudha Sankpal

WPL 2026 RCB Prize Money: स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने वुमन्स प्रीमियर लीग (WPL) मध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेतेपदाला गवसणी घातली. स्मृतीने कॅप्टन्स नॉक खेळ ४१ चेंडूत ८७ धावांची धडाकेबाज खेळी केली. आरसीबीने २०३ धावांचे आव्हान दोन चेंडू राखून पार केलं. तत्पूर्वी आरसीबीने गतवर्षी मुंबई इंडियन्सचा पराभव करत पहिल्यांदा wpl च्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर पुरूष संघाने देखील आयपीएल जिंकून आपला दुष्काळ संपवला होता.

यंदाच्या WPL विजेत्या संघावर बक्षीसांचा वर्षाव थाला आहे. फायनल जिंकल्यानंतर स्मृतीच्या आरसीबीला तब्बल ६ कोटी रूपयांचा चेक मिळाला आहे. WPL ही लीग आर्थिकदृष्ट्या स्थीर होत असून महिला फ्रेंचायज क्रिकेटमध्ये wpl ने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गतवर्षी आरसीबीने ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता त्यावेळी देखील त्यांना ६ कोटी रूपयांचेच बक्षीस मिळाले होते.

यंदाच्या WPL विजेत्या आरसीबीला ६ कोटी रूपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचा देखील खिसा भरला आहे. त्यांना 3 कोटी रूपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा wpl च्या फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे त्यांनी या लीगमध्ये चांगली कमाई केली आहे. जरी या दोन संघांना कोट्यावधी रूपये मिळाले असले तरी इतर संघांनीही कमाई केली आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रॉयल चॅलेंजर बंगळुरूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर फायनलमध्ये बाजी मारली, स्मृती मानधनाने ४१ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. तिला जॉर्जिया व्होलने चांगली साथ दिली. तिने ५४ चेंडूत ७९ धावा ठोकल्या. यो दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची दमदार भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच आरसीबीला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलं. आरसीबीने दिल्लीचे २०३ धावांचे आव्हान चार बॅटरच्या मोबदल्यात पार केलं.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ४ बाद २०३ धावा केल्या होत्या. कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिलं. होतं. तर हेन्रीने १५ चेंडूत ३५ धावा ठोकल्या होत्या. मात्र हे आव्हान तुटपुंजे पडले.

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा WPL ला विजेतेपद पटकावले. याचबरोबर wpl इतिहासातील सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबई इंडियनयन्सच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी देखील केली. दोन्ही संघांनी दोनवेळा WPL चे विजेतेपद जिंकलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT