Messi Kolkata Event File Photo
स्पोर्ट्स

Messi Kolkata Event : लिओनेल मेस्सीला फक्त २२ मिनिटातच सॉल्ट स्टेडियम का सोडावे लागले? समोर आले खरे कारण

कोलकात्‍यात लियोनेल मेस्सीचा बहुप्रतिक्षित GOAT टूर कार्यक्रम फक्त 22 मिनिटातच गुंडाळण्याची वेळ आली.

निलेश पोतदार

why lionel messi leave kolkata salt stadium just 22 minutes real reason

पुढारी ऑनलाईन :

कोलकात्‍यात लियोनेल मेस्सीचा बहुप्रतिक्षित GOAT टूर कार्यक्रम फक्त 22 मिनिटातच गुंडाळण्याची वेळ आली. व्हीआयपी लोकांचीच गर्दी, गर्दीवर नियंण ठेवण्याची कुचकामी ठरलेली व्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला स्टेडियम सोडणे भाग पडले. यानंतर चाहत्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आणि स्टेडियममध्ये तोडफोडीला सुरूवात झाली.

फुटबॉल चाहत्‍यांच्या गळ्यातला ताईत असलेला लियोनेल मेस्सीचा कोलकाता दौरा चांगलाच चर्चेत आला होता. त्‍याचे चाहतेही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. असा मोठा सोहळा फक्त 22 मिनिटांतच गुडाळला गेला. त्‍यामुळे चाहत्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली. सगळीकडे गोंधळ उडाला. GOATटूर अंतर्गत भारताच्या दुसऱ्या याला आलेल्या मेसीचा हा दौरा भारतात फुटबॉलसाठी महत्‍वाचा ठरेल असे मानले जात होते. मात्र कालच्या घटनेने या सर्व आशांवर पाणी फिरले गेले.

50 हजारहून अधिक चाहत्‍यांनी लावली उपस्थिती

जवळपास 50 हजार प्रेक्षकांनी स्टेडियमवर उपस्थिती लावली होती. ज्यामध्ये काहींनी 4 हजारहून अधिक किंमतीच्या तिकिटांची खरेदी केली होती. मात या महान खेळाडूभोवती राजकारणी, व्हीव्हीआयपी लोक कडक सुरक्षा व्यवस्था आणि सेल्फी घेण्यासाठी पडलेल्या गराड्यामुळे चाहत्‍यांना त्‍याचे दर्शनच झाले नाही.

स्टेडियमचे गेट सकाळी 8 वाजताच उघडण्यात आले. मेस्सी सकाळी 11:30 वाजता आपल्या इंटर मियामी टीमचे सहकारी लुईस सुआरेज आणि रोड्रिगो डी पॉल सोबत मैदानात उतरले. जसे ते मैदानात उतरले तसे त्‍यांच्या चाहत्‍यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

व्हीआयपी लोकांचाच गराडा....

PTI च्या माहितीनुसार, काही मिनिटातच मेसीला राजकारणी, पोलिस अधिकारी, व्हीआयपी आणि त्‍यांच्या टीमने घेरल्याचे दिसून आले. ज्यामुळे एकप्रकारचा मानवी साखळी निर्माण झाली. यामुळे तासंतास मेसीच्या एका दर्शनासाठी थांबलेल्या लोकांना त्‍याची एक झलक मिळणेही दुर्मिळ झाले.

दरम्यान इतकी गर्दी आणि उत्‍साह पाहून अचंबित झालेल्या मेस्सीने स्मित हास्य करत मैदानात एक फेरी मारण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी त्‍याने काही खेळाडूंना ऑटोग्राफही दिले. मात्र यावेळी व्यवस्था कोलमडून गेली.

अनियं;ित झालेली गर्दी पाहून पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून गर्दीला शांत राहण्याचे अपिल करण्यात आले. मैदान मोकळे करण्याचे आवाहन करण्यात आले. मातर लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्‍यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला त्‍याच्या एक तासाच्या नियोजित कार्यमाआधीच स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले आणि आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर परिस्थिती आणखीन चिघळली. यावेळी संतापलेल्या चाहत्‍यांनी स्टेडियममध्ये तोडफोडीला सुरूवात केली. सजावट तसेच स्टेडियमच्या संपत्‍तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT