आर्यमान बिर्ला. 
स्पोर्ट्स

Aryaman Birla RCB Chairman|कोण आहेत RCB चे नवे चेअरमन आर्यमान बिर्ला? एकेकाळी IPL लिलावात राजस्थान रॉयल्सने लावली होती बोली!

Aryaman Birla RCB Chairman |आर्यमान माजी क्रिकेटपटू असून त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले होते

पुढारी वृत्तसेवा

आर्यमान बिर्ला यांनी मध्य प्रदेशसाठी ९ सामने खेळताना ४१४ धावा केल्या. यामध्ये ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध ठोकलेल्या एका शतकाचा समावेश आहे.

Aryaman Birla RCB Chairman

बंगळूरु : आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने तब्बल १.७८ अब्ज डॉलर (१६,००० कोटी रुपयांहून अधिक) मोजून 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) संघ विकत घेतला आहे. या मोठ्या व्यवहारानंतर आता आर्यमान बिर्ला हे आरसीबीचे नवे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणार आहेत. जाणून घेवूया आर्यमान बिर्ला यांच्‍याविषयी...

तब्बल १.७८ अब्ज डॉलरचा व्‍यवहार

मंगळवारी झालेल्या या व्यवहारानुसार, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून (USL) आरसीबीचे पुरुष आणि महिला (WPL) अशा दोन्ही संघांची १०० टक्के मालकी या कंसोर्टियमने विकत घेतली आहे. या खरेदीमध्ये आदित्य बिर्ला समूहासोबत टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, डेव्हिड ब्लिट्झरची 'बोल्ट व्हेंचर्स' आणि अमेरिकेतील 'ब्लॅकस्टोन' इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा समावेश आहे.

कोण आहेत आर्यमान बिर्ला?

आर्यमान बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचे सुपुत्र आहेत. २८ वर्षीय आर्यमान हे स्वतः एक माजी क्रिकेटपटू असून त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्हणजे, त्यांनी आरसीबीचा सध्याचा कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे.

ईडन गार्डन्सवर झळकावले होते शतक

आर्यमान बिर्ला यांनी मध्य प्रदेशसाठी ९ सामने खेळताना ४१४ धावा केल्या. यामध्ये ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध ठोकलेल्या एका शतकाचा समावेश आहे. आयपीएल २०१८ च्‍या हंगामात राजस्थान रॉयल्सने आर्यमान यांना ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि २०२० च्या हंगामापूर्वी त्यांना संघातून मुक्त करण्यात आले होते.

आर्यमान बिर्ला यांनी का घेतला होता क्रिकेटमधून ब्रेक?

२०२० च्या सुमारास आर्यमान यांनी नैराश्यामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी इन्स्टाग्रामवर त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले होते की, "मला अडकल्यासारखे वाटत आहे. आतापर्यंत मी सर्व त्रासातून स्वतःला ढकलत पुढे नेले; पण आता मला माझ्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज वाटतेय." त्यानंतर ते पुन्हा क्रिकेटकडे वळले नाहीत आणि सध्या ते 'आदित्या बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.

आरसीबीचे अध्यक्षपद एक बहुमान

आरसीबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आर्यमान बिर्ला म्हणाले, "आरसीबीच्या विकासाचा पुढील टप्पा साकारण्यासाठी या भागीदारीत एकत्र येणे हा एक बहुमान आहे. ही भागीदारी क्रीडा, माध्यम आणि ग्राहक व्यवसायातील सखोल जाण एकत्र आणते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT