Wasim Akram pudhari photo
स्पोर्ट्स

Wasim Akram IPL vs PSL: मुलं मोठी होतात मात्र IPL चा हंगाम काही संपत नाही.... अक्रमनं ज्या थाळीत खाल्ल त्यातच छेद केला

वसिम अक्रमने दीर्घवेळ चालणाऱ्या IPL वर टोमणेबाजी केली आहे. त्यामुळेच विदेशी खेळाडू हे पाकिस्तान प्रीमियर लीगला पसंती देत असल्याचं वक्तव्य केलं.

Anirudha Sankpal

Wasim Akram IPL vs PSL: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने पाकिस्तान प्रीमियर लीगची तोंडभरून स्तुती केली आहे. मात्र ही स्तुती करताना ज्या आयपीएलनं कधीकाळी त्याला कोच अन् प्रशिक्षक म्हणून भाकरी दिली त्याच्यावर उपरोधिक टोला मारणं विसरला नाही. वसिम अक्रमने दीर्घवेळ चालणाऱ्या IPL वर टोमणेबाजी केली आहे. त्यामुळेच विदेशी खेळाडू हे पाकिस्तान प्रीमियर लीगला पसंती देत असल्याचं वक्तव्य केलं.

वसिम अक्रमने पाकिस्तान प्रीमियर लीग (PSL) ही ३४ ते ३५ दिवसात संपते. ही कमी सामन्यात आवरणारी लीग विदेशी खेळाडूंना अनेक महिने चालणाऱ्या इतर लीगपेक्षा जास्त आकर्षक वाटते. आयपीएलचा २०२४ चा हंगाम हा ६५ दिवस चालला होता. २०२५ चा पहलगाम हल्ल्यामुळं थोडा आवरता घ्यावा लागला होता.

वसिम अक्रमचा टोमणा

वसिम अक्रम PSL ची इतर लीगशी तुलना करताना म्हणाला, 'पाकिस्तान सुपर लीगची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती फक्त ३४ ते ३५ दिवसात संपते. पुढच्या वर्षी ती थोडी जास्त दिवस असेल. मात्र इतर लीगसारखी तीन महिने इतकी जास्त नक्कीच नसेल. मुलं मोठी होत असतात मात्र या लीग काही संपतच नाहीत. परदेशी खेळाडू ज्यावेळी पाकिस्तानमध्ये येतात त्यावेळी ते ३५ ते ४० दिवस खेळणे जास्त पसंत करतात. दोन किंवा तीन महिने हा काळ जास्तच होतो. मी देखील बोअर होतो.'

वसिम अक्रमने यासाठी बीबीएल आणि पीएसएलची तुलना केली. तो म्हणाला, 'बीबीएल सुरूवातीला दोन ते अडीच महिने खेळवली जात होती. मात्र चार ते पाच वर्षांनी त्याचा काही फायदा नाही असं दिसून आलं. आता त्यांनी त्यांचे ड्युरेशन हे ४० दिवसांवर आणलं आहे. हेच तर पाकिस्तान क्रिकेट लीगचे सौंदर्य आहे.'

गुणवत्तेचं गुणगाण

वसिम अक्रम पुढे म्हणाला, 'मी परदेशी खेळाडूंसोबत आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याबाबत विचारणा करतो त्यावेळी ते पाकिस्तान क्रिकेट लीगचं नाव घेतात. गुणवत्तेच्या बाबतीत पीएसएल ही अव्वल आहे कारण आपल्याकडं गुणवत्ता आहे संख्या नाही.'

अक्रमच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक क्रिकेट चाहत्यांनी या तुलना करण्यावर टीका केली असून त्याला आयपीएलसोबत तू देखील जोडला गेला होतास याची आठवण करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT