स्पोर्ट्स

Virat-Rohit : विजय हजारे ट्रॉफीत विराट, रोहितला किती मानधन मिळाले?

बीसीसीआयच्‍या नियमांनुसार देशांतर्गत मर्यादित षटकांतील सामन्‍यात अनुभवानुसार ठरते मानधन

पुढारी वृत्तसेवा

  • विराट-रोहितच्‍या पुनरागमनामुळे 'विजय हजारे ट्रॉफी' सध्‍या चर्चेत

  • देशांतर्गत मर्यादित षटकांच्या स्‍पर्धा खेळाडूंच्‍या वनडे टीम इंडिया संघ प्रवेशासाठी ठरते महत्त्‍वाची

  • आंतरराष्‍ट्रीत पातळीच्‍या तुलनेत देशांतर्गत सामन्‍यातील मानधन अल्‍प

Virat - Rohit Vijay Hazare Trophy Salaries

नवी दिल्‍ली : टीम इंडियाचे वन-डेमधील स्‍टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये पुनरागमन केले. या दिग्‍गज फलंदाज देशांतर्गत स्‍पर्धेत एक नवा उत्‍साह संचारला. ही स्‍पर्धा देशांतर्गत मर्यादित षटकांतील सर्वात महत्त्‍वाची स्‍पर्धा मानली जाते. यामधील खेळावरच टीम इंडियामधील प्रवेश सुकर होतो. यंदा विराट आणि रोहितमुळे या स्‍पर्धेत सहभाग जसा चर्चे ठरला तसाच त्‍यांना या स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी किती मानधन मिळाले याबाबतही चर्चा रंगली होती. याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मानधनासाठी खेळाडूंचे तीन श्रेणींमध्ये विभाजन

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही बीसीसीआयच्या केंद्रीय करारात असलेले खेळाडू असले, तरी विजय हजारे ट्रॉफीतील त्यांचे मानधन आयपीएलमधील कोट्यवधी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत खूपच कमी आहे. २०२५-२६ च्या हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनाची रचना त्यांच्या अनुभवावर (लिस्ट-ए सामन्यांच्या संख्येवर) आधारित आहे. यात खेळाडूंचे तीन श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

कशी आहे मानधनाची रचना?

मानधन रचना प्रतिसामना ही संघातील ११ खेळाडू, राखीव खेळाडू वरिष्ठ श्रेणीमधील (४० पेक्षा जास्त सामने), मध्यम श्रेणी (२१ ते ४० सामने) कनिष्ठ श्रेणी (० ते २० सामने) अशी आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये सामना खेळल्‍यास प्रति सामना खेळाडूला ६० हजारु रुपये मळितात. तर राखीव खेळाडू : ३०,००० रुपये0 प्रति सामना मिळतात. मध्यम श्रेणी (२१ ते ४० सामने) खेळलेल्‍या खेळाडूंचा संघात समावेश झाल्‍यास ५० हजारु रुपये तर राखीव खेळाडूस २५ हजार रुपये मिळतात. तसेच कनिष्‍ठ श्रेणी म्‍हणजे २०च्‍या आत लिस्‍ट ए सामने खेळाडूंना प्रति सामना ४०हजार रुपये तर राखीव खेळाडूंना २० हजार रुपये मिळतात.

विराट कोहली आणि रोहित शर्माला किती मिळाले मानधन?

सध्याच्या हंगामात दिल्लीकडून खेळणारा विराट कोहली आणि मुंबईकडून खेळणारा रोहित शर्मा हे दोघेही ४० पेक्षा अधिक लिस्ट ए सामने खेळलेले असल्याने त्यांना प्रत्येकी ₹६०,००० प्रति सामना मानधन मिळले. विशेष म्हणजे, देशांतर्गत स्पर्धेत त्यांना इतर अनुभवी खेळाडूंप्रमाणेच समान मानधन दिले जाते. बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी या दोघांना प्रत्येकी ₹६ लाख मानधन दिले जाते.

खेळाडूंना असते अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी

विजय हजारे ट्रॉफीतील कमाई केवळ सामन्याच्या फीपुरती मर्यादित नसते. खेळाडूंना पुढील माध्यमांतून अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकते. यामध्‍ये दैनंदिन भत्ता प्रवास, भोजन आणि निवासासाठी तरतूद आहे. सामनावीर पुरस्‍कार जिंकणार्‍या खेळाडूला १० हजार रुपये , तसेच स्‍पर्धेत बाद फेरी आणि अंतिम फेरी गाठणाऱ्या संघांना मिळणारी रक्कम खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्‍या मानधनात वाढ केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT