Virat Kohli LizLaz Pudhari
स्पोर्ट्स

Who Is LizLaz: विराट कोहलीच्या एका लाइकमुळे सोशल मीडियावर राडा; कोण आहे जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज?

Virat Kohli Instagram Like Controversy: विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाजच्या पोस्टला ‘लाइक’ केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली. फॅन्सनी यावर मीम्स आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli Instagram Like Controversy: क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारा विराट कोहली सोशल मीडियावरही तितकाच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या एका साध्या ‘लाइक’मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

‘लाइक’वरून पुन्हा सुरू झाली चर्चा

अलीकडेच विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज (LizLaz) हिच्या जुन्या इंस्टाग्राम पोस्टला ‘लाइक’ केल्याचं समोर आलं. ही पोस्ट 30 जानेवारीची असली तरी अचानक लाईक दिसल्याने फॅन्समध्ये चर्चा रंगली. विशेष म्हणजे विराट तिच्या अकाउंटला फॉलो करत नाही, तरीही हे लाईक कसं झालं, यावर सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

LizLaz

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ही बातमी समोर येताच ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत “एल्गोरिदम पुन्हा कामाला लागलं” असं म्हटलं, तर काहींनी याला मागच्या वर्षीच्या घटनेशी जोडून ट्रोलिंग सुरू केलं.

आधीही झाला होता असाच प्रकार

गेल्या वर्षी अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोवर विराटच्या अकाउंटवरून ‘लाइक’ झाल्याची घटना चर्चेत आली होती. त्यावेळी विराटने स्वतः स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की, इंस्टाग्राम फीड क्लीन करताना अल्गोरिदममुळे चुकून हे लाइक झालं. यावेळीही तसंच काहीसं झालं का? की हे जाणीवपूर्वक ‘लाइक’ केलं आहे, याबाबत अजून स्पष्टता नाही.

लिजलाज कोण आहे?

लिजलाज (LizLaz) ही जर्मनीची सोशल मीडिया क्रिएटर आहे. ती ट्रॅव्हल व्लॉगिंग, फूड आणि कल्चरशी संबंधित कंटेंट बनवते. तिला भारताबद्दल विशेष आकर्षण असून ती मुंबई, बेंगळुरू, गोवा, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये फिरत भारतीय संस्कृती आणि स्ट्रीट फूडवर व्हिडिओ तयार करते.

भारतातही मोठी फॅन फॉलोइंग

लिजलाजने अनेकदा विराट कोहली हा तिचा आवडता क्रिकेटर असल्याचं सांगितलं आहे.
तिच्या काही व्हिडिओंमध्ये तिने RCBची जर्सी घातलेली दिसत आहे. इंस्टाग्रामवर तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून भारतातही तिची लोकप्रियता वाढत आहे.

विराट कोहलीच्या एका ‘लाइक’मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा आणि मीम्सचा माहोल तयार झाला आहे. ही घटना खरोखरच अल्गोरिदमची चूक आहे की काही वेगळं, याचं उत्तर अजून स्पष्ट नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT