Virat Kohli On World Cup 27 pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli On World Cup 27: सतत लायकी सिद्ध करावी लागली तर... विराटचे WC 2027 वर मोठं भाष्य; एकाच वाक्यात अनेकांवर निशाणा

Anirudha Sankpal

Virat Kohli On World Cup 27: विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढचा वनडे वर्ल्डकप खेळणार का याबाबत अनेकदा चर्चा होत असते. या दोघांपैकी एकाचा जरी फॉर्म जरा वर खाली झाला की या चर्चांना उधाण येतं. आता आयपीएलमध्ये विराट कोहली धावांचा पाऊस पाडतोय. त्यामुळं त्याच्या कारकिर्दीबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे.

महत्वाच्या विषयावर भाष्य

विराटने देखील मयंती लँगरला मुलाखत देताना आपण २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले. मात्र हे संकेत देताना त्यानं आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली आहे. विराटने आपल्या कारकिर्दीत एक वनडे वर्ल्डकप, टी २० वर्ल्डकप दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी अजून एक वर्ष शिल्लक आहे. त्यामुळं विराटनं पुढचा वनडे वर्ल्डकप खेळणार का याचे उत्तर देतांना काही मुद्द्यांना हात घातला. त्याने सध्याचे वातावरण आणि सतत टांगती तलवार यावर भाष्य केलं.

विराट पुढचा वर्ल्डकप खेळणार?

मयंती लँगरने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये विराटला तू २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का असे विचारले. त्यावेळी विराटने आपण सध्या २०२६ च्या मध्यावर आहोत. मला हा प्रश्न अनेकवेळा विचारण्यात आला आहे की तू २०२७ मध्ये खेळणार आहेस का? नक्कीच मी माझे घर का सोडणार.. मी मला माहिती नाही मला काय हवं आहे असं उत्तर का देऊ. नक्कीच जर मी खेळत असेल तर मला क्रिकेट खेळायला आवडेल. भारतासाठी वर्ल्डकप खेळणं ही खूप छान गोष्ट आहे. मात्र योगदान महत्वाचे.

सतत सिद्ध करून दाखवावं लागलं तर...

विराट पुढे म्हणाला, माझा दृष्टीकोण स्पष्ट आहे. जर मी संघासाठी योगदान देत आहे. मी त्या व्यवस्थेचा भाग आहे. व्यवस्थेला वाटतंय की मी योगदान देऊ शकतो. तुम्ही मला वर्ल्डकप खेळताना पाहू शकता. मात्र जर मला सतत तुला सिद्ध करून दाखवावं लागेल या मोडमध्ये राहिलो तर मला ते वातावरण आवडणार नाही. मी माझ्या तयारीबाबत आणि माझ्या खेळाबद्दलच्या अॅप्रोचबाबत प्रमाणिक आहे. मी खाली मान घालतो आणी माझे काम करत राहोत. मी क्रिकेटच्या कारकिर्दीत जे काही मिळवलं आहे त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT