Virat Kohli 300 Sixes Pudhari
स्पोर्ट्स

Virat Kohli: 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6... विराट कोहली IPL च्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचणार? फक्त...

Virat Kohli 300 Sixes: विराट कोहली IPL मध्ये 300 षटकारांचा मोठा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या त्याच्या नावावर 291 षटकार असून फक्त 9 षटकारांची गरज आहे.

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli 300 Sixes Record: IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एक मोठा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळू शकतो. विराट कोहली पुन्हा एकदा विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि यावेळी लक्ष्य आहे 300 षटकारांचा टप्पा.

सध्या विराट कोहलीच्या नावावर IPL मध्ये 267 सामन्यांत 291 षटकार आहेत. म्हणजेच फक्त 9 षटकार मारताच तो IPL इतिहासात 300 षटकार पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत हा विक्रम फक्त दोन दिग्गजांनी गाठला आहे. एक रोहित शर्मा (302 षटकार)
आणि दुसरा ख्रिस गेल (357 षटकार).

पहिल्याच सामन्यात संधी

IPL 2026 चा पहिला सामना Royal Challengers Bengaluru आणि Sunrisers Hyderabad यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. हे मैदान छोट्या बाउंड्रीसाठी ओळखलं जातं, त्यामुळे कोहलीला हा विक्रम करण्याची चांगली संधी आहे.

IPL मधील कोहलीची कामगिरी

विराट कोहली हा IPL इतिहासातील सर्वाधिक जास्त धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 8661 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 39.54 आहे. त्याच्या नावावर 8 शतकं आणि 63 अर्धशतकं आहेत.

RCB ला विराट कोहलीवर विश्वास

IPL 2026 आधी RCB ने कोहलीला 21 कोटी रुपयांना रिटेन केलं आहे. यावरून टीमचा त्याच्यावर असलेला विश्वास दिसून येतो. नवीन हंगामात कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

काय घडू शकतं?

जर कोहलीने SRH विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 9 षटकार मारले, तर तो IPL इतिहासात 300 षटकारांचा टप्पा गाठणारा तिसरा खेळाडू बनेल. हे साध्य करणं सोपं नसलं तरी, कोहलीच्या फॉर्म आणि अनुभवावरून ते अशक्यही नाही. सगळ्यांची नजर आता विराट कोहलीवर असणार आहे, तो इतिहास घडवतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT