Football Player Lightning Death File Photo
स्पोर्ट्स

Viral Video: फुटबॉलचा सामना सुरू असताना मैदानावरच वीज कोसळली, २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

फुटबॉल सामना सुरू असताना मैदानावर अचानाक वीज कोसळल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Football Player Lightning Death

नवी दिल्ली: फुटबॉल सामना सुरू असतानाच मैदानावर अचानाक वीज कोसळल्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. दक्षिण थायलंडमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान, २४ वर्षीय थाई फुटबॉलपटू सोफवान अवे याचा वीज पडून मृत्यू झाला, तर इतर १२ खेळाडू जखमी झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खेळाडू पावसात फुटबॉल खेळत असताना अचानक मैदानावर वीज पडल्याचे आणि त्यासोबत मोठा आवाज झाल्याचे दिसते.

मिळालेल्या माहितीनुसार, 'गोलोक एफए कप' नावाची ही स्थानिक फुटबॉल स्पर्धा सुरू होती. यात हौशी आणि थाई-मलेशियन संघांचा समावेश होता. हा सामना अवेचा संघ 'सॅमकॉल्ट्स' आणि 'अबू x नोंग सिरिन' यांच्यात खेळला जात होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत सामना घेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून वादळाच्या वेळी सामना थांबवणे हा सर्वत्र अनिवार्य नियम असायला हवा, असे अनेकांनी म्हटले आहे.

२८३ मृत्यूंची नोंद

थायलंडमध्ये वीज पडल्यामुळे होणारे मृत्यू ही सामान्य बाब आहे. २०२० ते २०२४ या काळात देशभरात किमान २८३ जणांवर वीज पडली आणि त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT