भारताचा १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने शनिवारी १९ वर्षांखालील (U-19) विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. File Photo
स्पोर्ट्स

Vaibhav Suryavanshi |वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; १९ वर्षांखालील विश्वचषकात रचला नवा इतिहास

विराट कोहलीचाही विक्रम मोडला, बांगलादेशविरुद्धच्‍या सामन्‍यात ६७ चेंडूंमध्ये ७२ धावांची तुफानी खेळी

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Suryavanshi World Record

बुलावायो: भारताचा १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi )याने शनिवारी १९ वर्षांखालील (Under 19 World Cup) विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने केवळ ६७ चेंडूंमध्ये ७२ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत वैभवने अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

विश्वचषकातील सर्वात तरुण 'अर्धशतकवीर'

१४ वर्षे २९६ दिवस वय असलेल्या वैभवने पुरुषांच्या १९ वर्षांखालील विश्वचषक सामन्यात ५० हून अधिक धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानच्या शाहिदुल्ला कमालच्या (१५ वर्षे १९ दिवस) नावावर होता. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम आता तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

U-19 विश्वचषकात सर्वात कमी वयात ५०+ धावा करणारे खेळाडू

  • वैभव सूर्यवंशी (भारत): १४ वर्षे २९६ दिवस (विरुद्ध बांगलादेश, २०२६)

  • शाहिदुल्ला कमाल (अफगाणिस्तान): १५ वर्षे १९ दिवस (विरुद्ध विंडीज, २०१४)

  • बाबर आझम (पाकिस्तान): १५ वर्षे ९२ दिवस (विरुद्ध विंडीज, २०१०)

विराट कोहलीचाही विक्रम मोडला

वैभवने केवळ वयाचाच विक्रम मोडला नाही, तर 'यूथ वनडे' क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. वैभवने २० सामन्यांत १,०४७ धावा केल्या आहेत, तर कोहलीने २८ सामन्यांत ९७८ धावा केल्या होत्या. भारताकडून या यादीत विजय झोल (१,४०४ धावा) अव्वल स्थानावर आहे, तर जागतिक स्तरावर बांगलादेशचा नजमुल हुसेन शांतो (१,८२० धावा) पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतीय कर्णधाराने हस्तांदोलन टाळले

सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील तणावपूर्ण संबंधांची झलक पाहायला मिळाली. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेआणि बांगलादेशचा अजीझुल हकीम तमीम यांनी सामन्यापूर्वीची पारंपारिक हस्तांदोलन (Handshake) टाळले.दुसरीकडे, नाणेफेकीच्या वेळीही आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाला. अजीझुल हकीम अंतिम अकरामध्ये असूनही नाणेफेकीसाठी उपकर्णधार झवाद अबरार मैदानात आला. पावसाच्या व्यत्ययानंतर झालेल्या नाणेफेकीत अबरारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुलावायोच्या खेळपट्टीवरील ओलावा लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT