vaibhav sooryavanshi file photo
स्पोर्ट्स

vaibhav sooryavanshi: '२-३ हजार धावा...'; वैभव सूर्यवंशीने IPL 2026 साठी ठेवले गगनभेदी लक्ष्य; पाहा Video

ipl 2026 vaibhav sooryavanshi: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच सर्वांच्या नजरा एका युवा फलंदाजावर खिळल्या आहेत, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी.

मोहन कारंडे

ipl 2026 vaibhav sooryavanshi

नवी दिल्ली: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच सर्वांच्या नजरा एका युवा फलंदाजावर खिळल्या आहेत, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. गेल्या काही महिन्यांतील त्याच्या स्पोटक कामगिरीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये तो चौफेर फटकेबाजी करेल, अशी क्रीडाप्रेमींना खात्री आहे.

U-19 विश्वचषकाचा 'हिरो'

नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभवने १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. आता आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामासाठी वैभव सज्ज झाला असून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात तो दिसेल. राजस्थानचा पहिला सामना ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.

मैदानावर आक्रमक, मैदानाबाहेर हजरजबाबी

मैदानावर दिग्गज गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या वैभवने आता मैदानाबाहेरही प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला माध्यमांसमोर लाजाळू वाटणारा हा खेळाडू आता अधिक आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहे. नुकत्याच राजस्थान रॉयल्सच्या एका कार्यक्रमात त्याने आपल्या मिश्किल उत्तराने उपस्थितांना खळखळून हसवले.

काय म्हणाला वैभव?

वैभवला जेव्हा २०२६ च्या आयपीएलमधील त्याच्या वैयक्तिक लक्ष्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने अत्यंत विनोदी शैलीत उत्तर दिले.

पत्रकार: "IPL 2026 साठी तुझे काय प्लॅन्स आहेत? तुला किती धावा करायच्या आहेत, तुझे लक्ष्य काय आहे?"

वैभव सूर्यवंशी: "असा प्रश्न विचाराल तर मी दोन-तीन हजार धावा म्हणेन!" वैभवच्या या उत्तरावर सभागृहात एकच हशा पिकला.

त्यानंतर त्याने गंभीर होत पुढे सांगितले की, "मी किती धावा करेन हे आधीच ठरवू शकत नाही. मी फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे आणि मला संघाला ट्रॉफी जिंकून द्यायची आहे. माझे कोणतेही वैयक्तिक ध्येय नाही, फक्त सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल."

सर्वात तरुण शतकवीर

वैभव सूर्यवंशीने गेल्या हंगामात आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान पटकावला होता. त्याच्याकडे असलेली उत्तम तंत्रशुद्ध फलंदाजी आणि निडर वृत्ती पाहता, यंदाचा हंगाम तो गाजवणार यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT