Vaibhav Sooryavanshi  pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi NZ vs IND: संधी दिली मात्र वाया गेली... ना चौकार ना षटकार; वैभव १.२ षटकातच पॅव्हेलियनमध्ये

दुखापग्रस्त इशान किशनच्या जागी वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली. मात्र वैभव सलामीला न खेळता तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीला आला.

Anirudha Sankpal

Vaibhav Sooryavanshi NZ vs IND: न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात अखेर भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. अनेक दिवस अनेक दिग्गज वैभवला का खेळवत नाही अशी ओरड करत होते. तसेच त्याचा फॉर्म आपण वाया घालवतोय अशी देखील टीका होत होती.

इशान किशनच्या जागी मिळाली संधी

अखेर आज न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात दुखापग्रस्त इशान किशनच्या जागी वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली. मात्र वैभव सलामीला न खेळता तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीला आला. मात्र तो ८ चेंडूत ४ धावा करून माघारी परतला.

संधी वाया गेली

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० षटकात ५ बाद १८० धावा ठोकल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना भारताने चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी ४.४ षटकात ४० धावा केल्या होत्या. मात्र १७ धावांवर असताना संजू सॅमसन माघारी परतला.

संजू बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीकडे एक दमदार खेळी करून आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध करण्याची नामी संधी होती. तसेच इतके दिवस आपली पाठराखण करत आपल्यासाठी माईकवरून बॅटिंग करणाऱ्या दिग्गजांचे म्हणणे देखील खरे करण्याची संधी होती.

८ चेंडूचा धनी

मात्र ही संधी वैभवने दवडली. त्याला ८ चेंडूत फक्त ४ धावा करता आल्या. त्यात त्याला एकही चौकार मारता आला नाही. त्यामुळे आज त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली असणार विशेष म्हणजे आपल्या उत्तम स्ट्राईक रेटसाठी प्रसिद्ध असलेल्या वैभवने आजच्या सामन्यात फक्त ५० च्या स्ट्राईक रेटने ४ धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने २० षटकात ५ बाद १८० धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने ७० तर बेवॉन जेकबने ५८ धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने २ तर भूवनेश्वर, प्रिन्स आणि रेड्डीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

न्यूझीलंडचे १८० धावांचे आवहान पार करताना भारताची अवस्था बिकट झाली होती. भारताला १३ षटकात ५ बाद ९२ धावा झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT