रोनाल्डो-मेस्सी जोडीला 2003 नंतर पहिल्यांदाच बॉलन डी' ऑर पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. File Photo
स्पोर्ट्स

'रोनाल्डो-मेस्सी'ला २० वर्षात प्रथमच Ballon d'Or Award साठी नामांकन नाही

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या 20 वर्षांपासून फुटबॉल विश्व गाजवणाऱ्या रोनाल्डो आणि मेस्सी या जोडीने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यासह रोनाल्डो-मेस्सीने 2003 पासून बॉलन डी ऑर पुरस्कार गाजवले आहेत. परंतु, आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात असलेल्या रोनाल्डो-मेस्सी जोडीला 2003 नंतर पहिल्यांदाच फुटबॉल विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणार बॉलन डी' ऑर (Ballon d'Or Award) पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवता आलेले नाही.

मेस्सीने पटकावले सर्वाधिक बॅलन डी' ऑर

2003 नंतर प्रथमच, क्रिस्टियानो रोनाल्डो किंवा लिओनेल मेस्सी यांना 2024 मध्ये बॅलन डी'ओर पुरस्कारासाठी निवडलेल्या 30 उमेदवारांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सीने इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा (2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019, 2021 आणि 2023) अधिक वेळा बॅलोन डी'ओर जिंकला आहे. लिओनेल मेस्सीला गेल्या वर्षी आठव्यांदा विजेता घोषित करण्यात आले होते.

रोनाल्डोने पटकावले पाच बॅलन डी ऑर

पोर्तुगीज दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाच वेळा (2008, 2013, 2014, 2016 आणि 2017) हा पुरस्कार जिंकला आहे. 2008 ते 2017 या कालावधीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या नावावर हे जेतेपद होते. 2018 मध्ये क्रोएशियन फुटबॉलपटू लुका मॉड्रिचने हा पुरस्कार जिंकला होता. फ्रान्स फुटबॉलने बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी 2024 ची यादी प्रसिद्ध केली. यात ज्युड बेलिंगहॅम, विनिशियस ज्युनियर, कायलियन एमबाप्पे, लॅमिने यामल, निको विल्यम्स आणि डॅनी ओल्मो या नावांचा समावेश आहे.

गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा जिंकणाऱ्या रिअल माद्रिदकडे अंतिम 30 साठी इतर कोणत्याही क्लबपेक्षा जास्त उमेदवार आहेत. या उन्हाळ्यात युरो जिंकणाऱ्या स्पॅनिश संघातील सहा खेळाडूंना अंतिम 30 मध्ये स्थान देण्यात आले आहे, यात रॉड्रि, अलेजांद्रो ग्रिमाल्डो आणि डॅनी कार्वाहाल यांच्या व्यतिरिक्त यमल, विल्यम्स आणि ओल्मो यांचा समावेश आहे.

बॅलन डी'ओरसाठी नामांकित ३० खेळाडूंची यादी

ज्यूड बेलिंगहॅम, व्हिनिसियस ज्युनियर, रॉड्रि, डॅनी कार्वाहाल, बुकायो साका, रुबेन डायस, विल्यम सलिबा, फेडे व्हॅल्व्हर्डे, कोल पामर, लॅमिने यामल, एर्लिंग हॅलँड, किलियन एमबाप्पे, टोनी क्रुस, मार्टिन ओडेगार्ड, एमिलियानो मार्टिनेझ, ग्रॅनिट झाका, आर्टेम डोबी, आर्टेम हॅरी केन, मॅट्स हमेल्स, हकन कॅल्हानोग्लू, निको विल्यम्स, फिल फोडेन, फ्लोरियन विर्ट्झ, डॅनी ओल्मो, डेक्लन राइस, विटिन्हा, ॲडेमोला लुकमन, लॉटारो मार्टिनेझ, अलेजांद्रो ग्रिमाल्डो, अँटोनियो रुडिगर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT