T20 World Cup 2026 Super 8 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 Super 8: सुपर-8 चा पहिला सामना आज होणार; कोणते संघ भिडणार, लाईव्ह कधी आणि कुठे पाहता येणार?

T20 World Cup Super 8 Match Today: टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीला आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याने सुरुवात होत आहे. कोलंबोमध्ये होणाऱ्या या लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Rahul Shelke

T20 World Cup Super 8 Begins Today NZ vs PAk Clash: टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. लीग स्टेज संपल्यानंतर अवघ्या आठ संघांनी सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून, आजपासून या टप्प्यातील सामन्यांची सुरुवात होत आहे. ICC T20 World Cup 2026 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ पुढच्या फेरीत पोहोचले आहेत, तर उर्वरित 12 संघांचा प्रवास इथेच थांबला आहे.

सुपर-8 चा फॉरमॅट साधा आहे. पात्र ठरलेल्या आठ संघांना दोन गटांत विभागण्यात आलं आहे. प्रत्येक गटात चार संघ असून, प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर तिन्ही संघांशी एक-एक सामना खेळणार आहे. या फेरीनंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे होणार?

आज सुपर-8 मधील पहिला सामना गट-2 मध्ये खेळला जाणार असून, यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. लीग टप्प्यात दोन्ही संघांनी चारपैकी तीन सामने जिंकले होते आणि एक सामना गमावला होता, त्यामुळे या लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे.

हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. याच मैदानावर पाकिस्तानला यापूर्वी भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आजचा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 6.30 वाजता होणार आहे.

लाईव्ह क्रिकेट सामना कुठे पाहता येणार?

भारतातील प्रेक्षकांसाठी या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल, तर मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

न्यूझीलंडचा संघ

जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, कोल मॅककॉनी, डॅरिल मिशेल, ईश सोधी, जेकब डफी, मिशेल सँटनर (कर्णधार), मार्क चॅपमन, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, टिम सेफर्ट, ग्लेन फिलिप्स, फिन अॅलन, रचिन रवींद्र, बेन सियर्स.

पाकिस्तानचा संघ

फखर जमान, मोहम्मद नवाज, बाबर आझम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), फहीम अश्रफ, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान मिर्झा, ख्वाजा नाफे, उस्मान तारिक.

थोडक्यात सांगायचं तर, सुपर-8 चा पहिला सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता आहे, अनुभव आहे आणि विजयाची इच्छा देखील. या सामन्याचा निकाल पुढील समीकरणांवर मोठा प्रभाव टाकणार असल्याने, क्रिकेटप्रेमींना आज संध्याकाळी चांगलाच थरार पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT