T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: वर्ल्ड कपमध्ये आज 3 सामने, 6 संघ मैदानात… पाकिस्तानची प्रतिष्ठा पणाला, 2024चा बदला घेणार?

T20 World Cup Today Match: आज वर्ल्ड कपमध्ये तीन सामने रंगणार असून नेदरलँड्स-नामीबिया, न्यूझीलंड-यूएई आणि पाकिस्तान-अमेरिका हे सामने होणार आहेत. सर्वाधिक लक्ष पाकिस्तान-अमेरिका सामन्याकडे आहे.

Rahul Shelke

T20 World Cup 2026 Today Match: टी20 वर्ल्ड कपमध्ये आजचा दिवस प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी तब्बल तीन सामने होणार असून एकूण सहा संघ मैदानात उतरतील. आज (10 फेब्रुवारी) नेदरलँड्स–नामीबिया, न्यूझीलंड–यूएई आणि पाकिस्तान–अमेरिका या संघांचे सामने होणार आहेत.

आजच्या लढतींमध्ये सर्वाधिक लक्ष लागलं आहे पाकिस्तानच्या सामन्याकडे. कारण 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून झालेला धक्कादायक पराभव अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तानसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे.

पहिला सामना: नेदरलँड्स विरुद्ध नामीबिया

पहिला सामना ग्रुप ‘A’ मध्ये नेदरलँड्स आणि नामीबिया यांच्यात होणार आहे. पाकिस्तानकडून थोडक्यात पराभव झाल्यानंतर नेदरलँड्सला पुनरागमन करण्याची ही चांगली संधी आहे. मागील सामन्यात त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली होती. आकडेवारी पाहिली तर नामीबियाविरुद्ध नेदरलँड्सचं पारडं थोडं जड आहे. टी20मध्ये मागील चार सामन्यांपैकी तीन सामने नेदरलँड संघाने जिंकले आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण ग्रुपमधील पुढचे सामने याच निकालावर अवलंबून असणार आहे.

दुसरा सामना: न्यूझीलंड विरुद्ध यूएई

दुसऱ्या लढतीत ग्रुप ‘D’ मध्ये न्यूझीलंड आणि यूएई आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध विजयाने सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला हा सामना जिंकून ‘सुपर 8’ च्या दिशेने आणखी एक पाऊल टाकायचं आहे. दुसरीकडे यूएईकडे गमावण्यास फारसं काही नाही, पण कमावण्यासारखं बरंच काही आहे. मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव कमी असला तरी यूएईने गेल्या काही वर्षांत चांगली झुंज दिली आहे.

हायव्होल्टेज सामना: पाकिस्तान विरुद्ध अमेरिका

आजचा तिसरा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला सामना ग्रुप ‘A’ मध्ये पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. नेदरलँड्सवर मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तान सध्या दबावात आहे. फलंदाजीत सातत्य दिसत नसले तरी गोलंदाजी अजूनही त्यांची मोठी ताकद आहे.

मोहम्मद नवाज आणि अबरार अहमद यांनी मधल्या षटकांत चांगलं नियंत्रण ठेवलं आहे. पाकिस्तानसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. विजय मिळाल्यास ‘सुपर 8’ च्या शर्यतीत जातील. मात्र अमेरिका हलक्यात घेण्यासारखा संघ नाही. 2024 मध्ये पाकिस्तानला हरवून त्यांनी संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळीही ते पुन्हा एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

आजचे सामने – वेळ आणि थेट प्रक्षेपण

• नेदरलँड्स विरुद्ध नामीबिया – सकाळी 11 वाजता
• न्यूझीलंड विरुद्ध यूएई – दुपारी 3 वाजता
• पाकिस्तान विरुद्ध अमेरिका – संध्याकाळी 7 वाजता

हे तिन्ही सामने Star Sports वर थेट दाखवले जाणार असून ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT