T20 World Cup 2026 Points Table Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: वर्ल्ड कपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल; वेस्ट इंडिज पहिल्या क्रमांकावर, भारत कितव्या स्थानी?

T20 World Cup 2026 Points Table: सुरुवातीच्या सामन्यांनंतर वर्ल्ड कपच्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. नेट रनरेटमुळे वेस्ट इंडिज पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Rahul Shelke

T20 World Cup 2026 Points Table: वर्ल्ड कपची सुरुवात अपेक्षेपेक्षा अधिक रंगतदार झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत छोट्या संघांनी बलाढ्य संघांना चांगलंच झुंजवलं. त्यामुळे प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत चुरशीचा पाहायला मिळतोय आणि चाहत्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीच्या लढतींमध्ये नेदरलँड संघाने पाकिस्तानच्या संघाला टक्कर देत सर्वांचं लक्ष वेधलं. तर नेपाळ इंग्लंडविरुद्ध अवघ्या चार धावांनी पराभूत झाला. आयर्लंडनेही श्रीलंके समोर सहज हार मानली नाही. या सामन्यांतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, यंदा छोटे संघही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जिंकणं आता अवघड झालं आहे. दरम्यान, गट ‘A’ मध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात चांगली केली.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण आघाडीवर?

आतापर्यंत झालेल्या सामन्यात सहा संघांनी विजयासह खाते उघडलं आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले आहेत.

Group A
Group B
Group C
Group D

नेट रनरेटच्या आधारावर वेस्ट इंडिज सध्या पहिल्या स्थानावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यांमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता असून, स्पर्धा दिवसेंदिवस अधिक रोमहर्षक होत जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT