'आइसलँड क्रिकेट'ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) फिरकी घेत एक मिश्किल पोस्ट केली आहे 
स्पोर्ट्स

Viral Post |'या' क्रिकेट संघाने घेतली पाकिस्‍तानची 'फिरकी', T-20 विश्वचषक स्‍पर्धेत खेळण्‍याची दर्शवली तयारी!

स्‍पर्धेतील सहभागाबाबत पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डच्‍या धरसोड वृत्तीच्‍या पार्श्वभूमीवर केली मिश्किल पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

T20 World Cup 2026

नवी दिल्ली : संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष वेधलेल्‍या टी-२० विश्वचषक स्‍पर्धा येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या स्‍पर्धेतील सहभागाबाबत पाकिस्तानने अद्‍याप निर्णय घेतलेला नाही. संघ जाहीर केला असला तरी स्‍पर्धेवर बहिष्कार टाकण्याची पोकळ धमकीही या देशाच्‍या क्रिकेट बोर्डाकडून देण्‍यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, 'आइसलँड क्रिकेट'ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) फिरकी घेत एक मिश्किल पोस्ट केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाकिस्‍तान संघाचा स्‍पर्धेतील सहभागाबाबत निर्णय शुक्रवारी

सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करत त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. आयसीसीच्या या निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली असून, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याचा अंतिम निर्णय शुक्रवारी किंवा सोमवारी येण्याची शक्यता आहे.

आइसलँड क्रिकेटची मिश्किल टिप्पणी

आइसलँड क्रिकेटची मिश्किल टिप्पणी पाकिस्तानच्या या अनिश्चिततेचा फायदा घेत आइसलँड क्रिकेटने 'एक्‍स'वर पोस्ट करत म्हटले की, जर २००९ चा चॅम्पियन संघ (पाकिस्तान) स्पर्धेतून माघार घेत असेल, तर आम्ही त्यांची जागा घेण्यास तयार आहोत.

आमचा सलामीवीर तर आधीच निद्रानाशाचा रुग्ण...

"पाकिस्तानने त्यांच्या सहभागाबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. जर त्यांनी २ फेब्रुवारीला माघार घेतली, तर आम्ही लगेच निघण्यास तयार आहोत. मात्र, ७ फेब्रुवारीपर्यंत कोलंबोला वेळेत पोहोचण्यासाठी विमानांचे वेळापत्रक सांभाळणे ही मोठी डोकेदुखी ठरेल. आमचा सलामीवीर तर आधीच निद्रानाशाचा रुग्ण आहे (त्याला झोप येत नाही)!", असे टोला लगावात केफ्लाविक ते कोलंबो प्रवासाच्या वेळापत्रकाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

आमच्‍या पुढील सर्व पर्याय खुले : मोहसिन नक्‍वी

पाकिस्तानची भूमिका अद्याप अस्पष्ट दुसरीकडे, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या सर्व पर्याय खुले असून पंतप्रधानांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्याबद्दल पाकिस्तानने निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे, या वादादरम्यान पाकिस्तानने आपला २० जणांचा संघ जाहीर केला असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारा संघच या स्पर्धेतही मैदानात उतरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT