कुस्तीपटू बजरंग पुनियाला अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने पुन्हा एकदा निलंबित केले आहे.  Bajrang Punia
स्पोर्ट्स

Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियावर पुन्हा निलंबनाची कारवाई

कुस्तीपटू बजरंग पुनियावर पुन्हा निलंबनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याला अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने पुन्हा एकदा निलंबित केले आहे. बजरंग पुनियाला यापूर्वी नाडाने निलंबित केले होते. आता पुन्हा २३ जून रोजी त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे पुनिया याच्यावरील निलंबनाची कारवाई शिस्तपालन समितीने मागे घेतली होती. कारण त्याला आरोपाची नोटीस बजावण्यात आली नव्हती. पण आता, नाडाने नोटीस जारी करत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला निलंबित केले आहे.

नाडाच्या माहितीनुसार, बजरंगने १० मार्च रोजी सोनीपत येथे ट्रेल्स दरम्यान मुत्र चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याला डोप नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती बजरंगचे वकील विशुपथ सिंगानिया यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. “होय आम्हाला नोटीस मिळाली आहे. त्याला आम्ही नक्कीच उत्तर देऊ. मागच्या वेळीही आम्ही सुनावणीला हजर राहिलो होतो आणि यावेळीही आम्ही आमची बाजू मांडू. त्याने काही चुकीचे केले नाही, त्यामुळे आम्ही लढा देऊ,” असे बजरंगचे वकील म्हणाले.

नाडाने नोटीसमध्ये काय म्हटले आहे?

नोटिशीला उत्तर देण्यासाठी बजरंगला ११ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. बजरंगला पाठवलेल्या नोटीसमध्ये नाडाने म्हटले आहे की, “डीसीओने तुमच्याशी संपर्क साधला होता आणि तुम्हाला कळवले होते की तुम्हाला डोप विश्लेषणासाठी मुत्र चाचणीचा नमुना देणे आवश्यक आहे. डीसीओने केलेल्या अनेक विनंतीनंतरही, तुम्ही मुत्र चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT