Suryakumar Yadav T20I Captaincy: सूर्यकुमार यादवनंतर भारतीय टी २० संघाचा कर्णधार कोण या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआय लवकरच शोधण्याची शक्यता आहे. ३५ वर्षाचा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षीचा टी २० वर्ल्डकप जिंकला होता. आता बीसीसीआय मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सूर्यकुमारचा उत्तराधिकारी कोण याबाबत अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता आहे.
१९ मे रोजी बीसीसीआय गुवाहाटीमध्ये एक महत्वाची बैठक करणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या भविष्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सल्ला घेतला जाणार आहेत.
अफगाणिस्तानिरूद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी आणि त्यानंतर वनडे मालिकेसाठी संघ निवड केली जाणार आहे. यासाठी मंगळावारी बैठक बोलावण्यात आली आहे. या दौऱ्यात जरी टी २० सामने नाहीत तरी देखील बैठकीदरम्यान बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया टी २० कर्णधार सूर्युकमारच्या भविष्यााबाबत अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून भविष्य काय असे हे ठरवण्यामध्ये प्रमुख कोच गौतम गंभीरची मुख्य भूमिका असणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जर सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले तर फलंदाज म्हणूनही त्याची संघातील जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याबाबत सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे त्याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी २० मालिकेत कॅप्टन्सीची संधी दिली जाईल. या मालिकेत त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीच्या आधारे त्याच्या भविष्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र हा सुरक्षित पर्याय निवड समिती मान्य करेल याची काही शाश्वती नाही.
सूर्यकुमारसाठी २०२५ हे वर्ष वाईट केलं आहे. त्याला संपूर्ण वर्षात फलंदाजीत संघर्ष करावा लागला आहे. मात्र २०२६ मधील वर्ल्डकपमध्ये त्याने फॉर्म परत मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली टी २० वर्ल्डकप देखील जिंकला. मात्र आयपीएलमध्ये त्याची कामगिरी पुन्हा खालावली.
सूर्यकुमारने २०२५ मध्ये २१ सामन्यात फक्त २१८ धावा केल्या होत्या. संपूर्ण वर्षात त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. त्याने १३.६२ च्या सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १२३.१६ इतकी होती. मात्र २०२६ मध्ये त्याने फॉर्म परत मिळवला. आतापर्यंत त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ४ अर्धशतकांसह ४८४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४४ तर स्ट्राईक रेट १६१.३३ होता.
सूर्याचे टी २० कर्णधारपदाचे रेकॉर्ड शानदार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. त्यात भारताला ४० सामन्यात विजय मिळाला असून ८ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. २ सामने सुपर ओव्हरमध्ये गेले होते. त्यात भारताचा विजय झाला आहे. सूर्याच्या नेतृत्वात संघाने जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत.