आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने 140 कोटी भारतीयांना विजयाची भेट देण्यासाठी आपण निर्धाराने मैदानावर उतरणार असल्याचे अभिवचन दिले.
ठळक वैशिष्ट्य म्हणजे, 12 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल सहा प्रश्न विचारण्यात आले. मात्रकशी असेल, यावर काहीही बोलणे टाळले.
सूर्यकुमार याप्रसंगी पुढे म्हणाला, या स्पर्धेसाठी आमची तयारी खूप चांगली झाली आहे. आम्ही मागील तीन सामन्यांत उत्तम खेळलो आहोत. सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल. मागील दोन-तीन सामन्यांमधून घेतलेले सकारात्मक धडे येथे आमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
मागील लढतीत आम्ही पाकिस्तानला हरवले आहे, पण, आम्ही त्यांना एकदा हरवले याचा अर्थ आम्हाला फायदा मिळेल असे नाही. आम्हाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करावी लागेल आणि जो संघ चांगला खेळेल तोच सामना जिंकेल.