India women vs Pakistan women : नुकत्याच आशिया चषक T-20 चषकावर नाव कोरणार्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. आज (५ ऑक्टोबर) दुबई येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक सामन्यापूर्वी त्याने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची 'गुणवत्ता' अप्रत्यक्षपणे दाखवून दिली.
'जिओस्टार'शी सूर्यकुमार यादव म्हणाला की, भारतीय महिला क्रिकेट गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या ब्रँडचे क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी होत आहे. आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी अशीच कामगिरी सुरु ठेवल१२-o शक्य आहे. काही दिवसांपूर्वी मी कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याशी बोललो. संघ चांगल्या स्थितीत आहे. जेव्हा संघातील सर्वच खेळाडू सकारात्मक मनस्थितीत असतात तेव्हा स्वाभाविकपणे विजय मिळतो.
तुम्ही प्रतिस्पर्ध्याबद्दल (पाकिस्तान संघ) बोललात तर दोन संघ १२ सामने खेळतात आणि त्यांचा स्कोअर ६-६ किंवा ७-५ असतो. पण ११-० ही स्पर्धा नाही. कारण भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्ध सलग ११ सामने जिंकले आहेत. पुरुष संघ असो की महिला संघ अलिकडच्या काळात पाकिस्तान आपल्याला हरवू शकलेला नाही. जर आज भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी आपल्या खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की ते १२-० करू शकतील. मला वाटते की आपण त्यांच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळलो आहोत, चांगली गोलंदाजीही केली आहे. सांख्यिकीयदृष्ट्या, ही आता स्पर्धा नाही."